नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांच्या कुटुंबियांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी ऑपरेशन सिंदूर राबवले, ज्यामध्ये पाकिस्तानचे प्रमुख दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.
भारताने हा हवाई हल्ला कसा केला आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर किती हुशारीने निवडकपणे लक्ष्य केले याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने जारी केला आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येक लक्ष्य कसे गाठले गेले आणि लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या कसे पार पाडण्यात आले? हे दाखवण्यात आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ –
OPERATION SINDOOR#JusticeServed Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli.
Distance – 13 Km from Line of Control (POJK).
Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT).
Key training infrastructure for over 50 terrorists. DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.… pic.twitter.com/OBF4gTNA8q — ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 7, 2025
हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरची मीडिया ब्रीफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका कोण आहेत?
अब्बास दहशतवादी तळ उद्ध्वस्त –
बुधवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास भारतीय लष्कराने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराचे जवान लष्कर-ए-तैयबाचे अड्डे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सुमारे 34 सेकंदांचा आहे. हे पाकिस्तानातील कोटली येथील अब्बास दहशतवादी छावणीचे आहे. ते भारतीय नियंत्रण रेषेपासून (POJK) 13 किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे 50 हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
हेही वाचा – ‘आज माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळेल…’; ऑपरेशन सिंदूरवर शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया
दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब ठार –
पाकिस्तानी माध्यमांनुसार, या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब मारले गेले आहे. तर दहशतवादी मसूद तेथून पळून गेला. भारतीय सैन्याच्या कारवाईत मसूदच्या भावासह अनेक नातेवाईक मारले गेले. ते सर्वजण या दहशतवादी छावणीत राहत होते.