Gorakhpur Shocker: घोर कलियुग! ‘आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवा…’, वृध्दाश्रमला मुलाचं धक्कादायक उत्तर

भुआल गुप्ता आणि त्यांची पत्नी शोभा देवी यांना तीन मुले आणि तीन मुली अशी सहा अपत्ये आहेत. वर्षभरापूर्वी मोठ्या मुलाने घरावरील ओझं असा आरोप करत वृद्ध दाम्पत्याला घरातून बाहेर काढले.

Gorakhpur Shocker: घोर कलियुग! ‘आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवा…’, वृध्दाश्रमला मुलाचं धक्कादायक उत्तर

Gorakhpur Shocker: गोरखपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कुटुंबातील लग्नसोहळ्याचा हवाला देत एका मुलाने स्वतःच्या आईचा मृतदेह घरी आणण्यास नकार दिल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मृत महिलेचे पती भुआल गुप्ता यांना अखेर पत्नीचा मृतदेह गावात घेऊन जाऊन घाटाजवळ दफन करावा लागला.

वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर हाकलले

भुआल गुप्ता आणि त्यांची पत्नी शोभा देवी यांना तीन मुले आणि तीन मुली अशी सहा अपत्ये आहेत. सर्वांची लग्नं लावून दिल्यानंतर, वर्षभरापूर्वी मोठ्या मुलाने घरावरील ओझं असा आरोप करत वृद्ध दाम्पत्याला घरातून बाहेर काढले. मानसिक धक्क्यात त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, परंतु एका अनोळखी व्यक्तीने त्यांना वाचवून वृद्धाश्रमात दाखल केले. त्यानंतर हे दाम्पत्य तेथेच राहत होते.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime : कडेठाण हादरलं! लेकानेचं बापाला संपवलं; मृतदेह घरातच पुरल्याने उघड झालं मुलाचं राक्षसी कृत्य

आईच्या मृत्यूनंतर फोनवरून मुलाचं धक्कादायक उत्तर  

काही दिवसांपूर्वी शोभा देवी यांचे वृद्धाश्रमात निधन झाले. आश्रम प्रमुख रवी यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला माहिती दिली व आईची शेवटची इच्छा अंत्यसंस्कार गोरखपूरमध्ये व्हावेत हेही सांगितले. धाकट्या मुलानं मोठ्या भावाशी संपर्क साधला, परंतु मोठ्या मुलाने धक्कादायक उत्तर दिलं. 'घरात मुलाचं लग्न सुरू आहे. आत्ता मृतदेह आणला तर अपशकुन होईल. चार दिवस मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवा. कार्यक्रम संपल्यानंतर अंत्यसंस्कार करू,' हे उत्तर ऐकून वृद्ध भुआल गुप्ता अवाक झाले. मुलींनी पुढाकार घेऊन मृतदेह गोरखपूरला आणण्याची तयारी दर्शवली.

हेही वाचा – Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग

घरी मृतदेह आणण्यास मुलाचा पुन्हा नकार

दरम्यान, भुआल गुप्ता मृतदेहासह गोरखपूरला पोहोचले तरी मोठ्या मुलाने मृतदेह घरात आणू देण्यास पुन्हा स्पष्ट नकार दिला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गावकरी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेत शोभा देवी यांचे कॅम्पियरगंज घाटाजवळ अंत्यसंस्कार केले. या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, आई-वडिलांबद्दल वाढत्या दुर्लक्षाचा हा आणखी एक वेदनादायक नमुना असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number