गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र! आपत्कालीन परिस्थितीत तयार राहण्याचे आदेश

भारत-पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत.

गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र! आपत्कालीन परिस्थितीत तयार राहण्याचे आदेश
Edited Image

नवी दिल्ली: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत युद्धासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. आज सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान सीमेवरील अनेक चेकपोस्टवरून जोरदार गोळीबार केला. ज्याला भारतीय सैन्य चोख प्रतिउत्तर देत आहे. दरम्यान, युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा – कोणत्या देशाकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत? पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे आहे जड

आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याचे आदेश –  

या पत्रात गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि जिल्हा प्रशासनांना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदारीच्या उपाययोजनांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यास सांगितले आहे. याशिवाय, युद्धादरम्यान रसद इत्यादी आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात घेतले सात फेरे; अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले. भारतीय लष्कराने हवेतच तीन पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि ड्रोन पाडले. यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी शहरांमध्येही विविध ठिकाणी हवाई हल्ले केले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number