Prashant Kishor : Gen Z चा राजकीय धमाका! 30 वर्षांचा भाजपचा गड ढासळला, प्रशांत किशोरांच्या ऐतिहासिक विजयामागची 6 मोठी कारणं

विविध राजकीय पक्षांना निवडणुका जिंकवून देणारे प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या 'जन सुराज' पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरून विजय मिळवला आहे.

Prashant Kishor :  Gen Z चा राजकीय धमाका! 30 वर्षांचा भाजपचा गड ढासळला, प्रशांत किशोरांच्या ऐतिहासिक विजयामागची 6 मोठी कारणं

Prashant Kishor : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध राजकीय पक्षांना निवडणुका जिंकवून देणारे प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या 'जन सुराज' पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरून विजय मिळवला आहे. भाजपचा अत्यंत सुरक्षित आणि 30 वर्षांपासून वर्चस्व असलेला हा शहरी मतदारसंघ हस्तगत करून प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे.

तरुणांचा असंतोष आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद
या ऐतिहासिक विजयामागे राज्यातील बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील पेपरफुटीवरून पेटलेले विद्यार्थी आंदोलन हे मुख्य कारण ठरले. संतापलेला तरुण आणि सुशिक्षित मतदारवर्ग प्रशांत किशोर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. दुसरीकडे, भाजपने शेवटच्या क्षणी ऐनवेळी बदललेला उमेदवार पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांना रुचला नाही. यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आणि त्याचा थेट फटका मतदानाच्या दिवशी भाजपला बसला.

विरोधी मतांचे ध्रुवीकरण आणि जातीय समीकरणांची जुळवाजुळव
राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) संथ प्रचार आणि तेजस्वी यादव यांची उशिरा झालेली एंट्री यामुळे भाजपविरोधी आणि मुस्लिम मते RJD ऐवजी प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडे वळली. तसेच, कायस्थ, सवर्ण आणि वैश्य या भाजपच्या पारंपरिक मतदारांमधील तरुण वर्गानेही बदलाचा पर्याय म्हणून 'जन सुराज'ला पसंती दिली. स्थानिक पातळीवर 'बाहेरचा उमेदवार' अशी टीका होण्याऐवजी, प्रशांत किशोर यांच्या प्रत्यक्ष जनसंपर्काचा मतदारांवर अधिक प्रभाव पडला.

हेही वाचा – Shiv Sena UBT Matoshree Meeting : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी! संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

बूथ मॅनेजमेंटचा फुसका बार आणि नव्या राजकारणाची नांदी
नेहमीप्रमाणे आपल्या तगड्या कॅडरवर अवलंबून असलेल्या भाजपचे बूथ मॅनेजमेंट यावेळी निष्प्रभ ठरले. 'जन सुराज'च्या तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर दिलेली कडवी झुंज भाजपच्या गणितांवर पाणी फिरवणारी ठरली. बांकीपूरमधील हा धक्कादायक निकाल म्हणजे केवळ एका जागेचा विजय नसून, बिहारच्या पारंपरिक जाती आधारित राजकारणाला छेद देणारा मोठा इशारा मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number