Crime News : आधी अमानुष अत्याचार नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्… 15 वर्षांच्या मुलीसोबत निर्भया प्रकरणासारखं कृत्य

कुटुंबातील इतर सदस्य उशिरा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये त्या चिमुकलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.

Crime News : आधी अमानुष अत्याचार नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्… 15 वर्षांच्या मुलीसोबत निर्भया प्रकरणासारखं कृत्य

Crime News : दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री एका कौटुंबिक सोहळ्यात चुलत भावाशी किरकोळ खटका उडाल्यामुळे 15 वर्षीय मुलगी एकटीच घरी परतली होती. कुटुंबातील इतर सदस्य उशिरा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये त्या चिमुकलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. नराधमांनी तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने प्राणघातक वार केले होते. याशिवाय, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने अमानुष इजा पोहचवल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. पोलीस अधीक्षक अमिताभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला असून 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अत्याचार आणि हत्येबाबत अधिक तांत्रिक बाबी स्पष्ट होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Ambadas Danve: खाजगी बसमध्ये महिलेचा दोनदा विनयभंग! धक्कादायक प्रकारावर दानवेंचा संताप, ट्वीट करत व्यक्त केली नाराजी

नागरिकांचा संताप आणि महामार्गावर 'रास्ता रोको'
या घटनेची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विकृत आणि अमानुष कृत्यातील दोषींना लवकरात लवकर फाशीची किंवा कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शेकडो संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर उतरून जोरदार निदर्शने करत 'रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number