Dharmendra Pradhan Resigns: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक; ‘हा युवाशक्तीचा विजय’ म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल

देशातील तरुण पिढीला कोणत्याही संभ्रमात किंवा अनिश्चिततेच्या चक्रात अडकू देणार नाही, असे सांगत प्रधान यांनी पद सोडल्याचे स्पष्ट केले. यानंतर विरोधकांच्या जोरदार प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Dharmendra Pradhan Resigns: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक; ‘हा युवाशक्तीचा विजय’ म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल

Dharmendra Pradhan Resigns as Education Minister: नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत पेटलेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील तरुण पिढीला कोणत्याही संभ्रमात किंवा अनिश्चिततेच्या चक्रात अडकू देणार नाही, असे सांगत प्रधान यांनी पद सोडल्याचे स्पष्ट केले. गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी, विविध संघटना आणि राजकीय नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अनेक दिवसांच्या अखंड संघर्षानंतर सरकारने आंदोलकांसमोर झुकून घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या लढ्याचा मोठा विजय मानला जात असून, विरोधकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; 'या नव्या युवा पिढीचा मला सार्थ अभिमान'
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करत तरुणांच्या धैर्याचे कौतुक केले आहे:
– उशिरा का होईना शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
– सरकारविरोधात असताना, पोलिसांचा लाठीमार आणि धमक्या सहन करूनही हतबल न होता लढणाऱ्या या नव्या युवा पिढीचा मला सार्थ अभिमान वाटतो.
– कोणत्याही दबावाला न बळी पडता तरुणांनी ज्या ताकदीने हा लढा जिंकला, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.

हेही वाचा – Dharmendra Pradhan Resign: ‘हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही…’ विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार बॅकफुटवर; धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रात काय?

'हा तर युवाशक्तीचा विजय'; भाजप बॅकफूटवर गेल्याचा काँग्रेसचा दावा
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना हा देशभरातील युवाशक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे. जर सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता, तर विद्यार्थ्यांना एवढा मोठा संघर्ष करावा लागला नसता, असे त्यांनी नमूद केले. या घडामोडीमुळे भारतीय जनता पार्टी आता राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर गेली असून, काँग्रेस पक्ष भविष्यातही तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनापुढे सरकार नमलं; राजकीय वर्तुळातील पडसाद
राजधानी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी' आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासह विविध संघटनांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली होती. आंदोलनाचा वाढता जोर पाहून हळूहळू विविध सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही याला पाठिंबा दर्शवला. अखेर वाढत्या जनक्षोभापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे परीक्षेतील घोटाळ्यांचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Abhijeet Dipkde on Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, ' सरकारमध्ये कोण राजीनामा देत नाही…'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number