Dhirendra Krishna Shastri : ‘सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती..’; बिहार निवडणुकीच्या निकालावर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया

निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Dhirendra Krishna Shastri : ‘सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती..’; बिहार निवडणुकीच्या निकालावर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया

Bageshwar Baba on Bihar election result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे (Bihar Election Results) देशाच्या राजकीय पटलावर मोठी उत्सुकता आहे. निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने (NDA) मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, राजकीय नेते आणि जाणकारांसोबतच धार्मिक आचार्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मथुरेतील एका कार्यक्रमात या निकालावर आपली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जनतेचा आशीर्वाद आणि राष्ट्रवादी विचारधारा
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरणात एका नवीन चर्चेची भर पडली आहे. त्यांनी कोणताही विशिष्ट पक्षाचा उल्लेख न करता, केवळ राष्ट्राच्या हितावर जोर दिला. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "बिहारमध्ये तोच पक्ष जिंकेल, ज्याला जनतेने मनापासून मतदान केले आहे. जनतेचा आशीर्वाद सर्वात मोठा असतो. आम्ही फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतो की, राष्ट्रवादी विचारधारेला आणि सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती सत्तेत यावी."

हेही वाचा – Maithili Thakur : आमदार म्हणून हा माझा पहिलाच कार्यकाळ…, मी माझ्या लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन…; निकालाआधीच मैथिलीचा व्हिडिओ व्हायरल

लोकशाहीचा उत्सव आणि समाजाचे हित
शास्त्रींनी निवडणुकीला 'लोकशाहीचा उत्सव' असे संबोधले आणि लोकशाहीमध्ये जनता नेहमीच सर्वोपरी असते, यावर जोर दिला. त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले की, "आम्ही लोकांना फक्त इतकेच सांगतो की, तुम्ही ज्याला आपला नेता मानाल, तो राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी समर्पित असावा. जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे." देश आणि समाजाच्या हितासाठी काम करणारे सरकार स्थापन व्हावे, अशी त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिहार निकालाचे सुरुवातीचे चित्र
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षाने विक्रमी कामगिरी करत तब्बल 75 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपचे उमेदवार 85 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला (RJD) केवळ 36 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेसचे फक्त सहा उमेदवार आघाडीवर आहेत. विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 191 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – संजय राऊत म्हणाले,'एकदम महाराष्ट्र पॅटर्न!'; बिहारच्या निकालावर 'निवडणूक आयोग आणि भाजपचे राष्ट्रीय कार्य' म्हणत खोचक टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number