बुलडाणा : बुलडाण्यातील खामगाव येथून सामान्य रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे स्वॅबची अदलाबदली करण्याची मोठी घटना घडली आहे . पॉझिटिव्ह रुग्णाचे स्वॅब कंत्राटी सेवक परस्पर विकायचे, विजय राखोंडे असं स्वॅब विकणाऱ्या सेवकाचं नाव आहे. काही दिवसापूर्वी हे प्रकरण पुढे आले . यातच शहरातील पार्ले कंपनीतील कामगाराचे स्वॅब पॉझिटिव्ह असताना देखील निगेटिव्ह दाखवले गेले. जेव्हा कामगार कोरोना बाधित निघायचा तेव्हा त्याला १ लाख रुपायची मदत मिळायची.
शिवांगी ब्रेकर्स या खाजगी कंपनीत ७०० कर्मचार्यापैकी तब्बल १६२ लोकांना मागील काही दिवसात कोरोना झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. त्यामुळे कंपनीकडून उपचारासाठी मिळत असलेल्या रक्कमेचा लाभ किती कामगारांनी घेतला व यातील बनावट लाभार्थी किती आहेत, याचा तपास सुरू आहे.