Bypoll Election: पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 6029 मतांच्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

Bypoll Election: पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; नेमकं काय घडलं?

Datiya Bypoll :  मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 6029 मतांच्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या पराभवाचे पडसाद भाजपमध्ये तात्काळ उमटले असून पक्षाने दतिया जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री गौरव रणदिवे आणि वरिष्ठ नेते अंबाराम कराडा यांच्या दोन सदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

अंर्गत फितुरीचे पुरावे अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वादळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत भाजपचे पराभूत उमेदवार आशुतोष तिवारी यांनी स्वपक्षीय नेत्यांवरच अंतर्गत विश्वासघाताचे गंभीर आरोप केले. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ नेत्यांसमोर सादर केले. या पुराव्यांची दखल घेत पक्षाने कोणतीही गय न करता तातडीने दतिया जिल्हा संघटन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्य प्रदेश भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

विजयी काँग्रेसमध्येही संघटनात्मक पुनर्रचना; जुने पदाधिकारी कार्यमुक्त
दुसरीकडे, दतियातील ऐतिहासिक विजयानंतरही मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सूचनेनुसार प्रदेश काँग्रेस कमिटीतील सध्याच्या पदाधिकाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांनी 5 ऑगस्ट रोजी अधिकृत पत्र जारी करून या निर्णयाची घोषणा केली. 

हेही वाचा – Mark Zuckerberg Apology : मार्क झुकरबर्ग अखेर झुकले! पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्याप्रकरणी मागितली माफी

पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी आणि संघटनात्मक पुनर्रचना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांना देण्यात आली असून लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number