Eetha Teaser Out: भयंकर प्रसुती कळा, नाळ ठेचून पुन्हा उभी राहीली तमाशाच्या फडावर, ‘ईठा’चा संघर्ष अन् अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

श्रद्धा कपूर आता एका अत्यंत शक्तिशाली भूमिकेसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी 'ईठा' (Eetha) या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर अखेर निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

Eetha Teaser Out: भयंकर प्रसुती कळा, नाळ ठेचून पुन्हा उभी राहीली तमाशाच्या फडावर, ‘ईठा’चा संघर्ष अन् अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

Eetha Teaser Out:  ‘स्त्री 2’ च्या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका अत्यंत शक्तिशाली भूमिकेसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘ईठा’ (Eetha) या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर अखेर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, श्रद्धा कपूरचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थक्क करून सोडणारी आहे.

नऊ महिन्यांची गरोदर असताना मंचावर उतरली ‘ईठा’; पाहा थरारक टीझर
‘ईठा’ हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्यावर आधारित आहे. टीझरची सुरुवात एका लावणी सादरीकरणाने होते, जिथे संतप्त प्रेक्षकांचा जमाव ‘ईथा’ला मंचावर आणण्यासाठी गोंधळ घालताना दिसतो. दुसरीकडे, पडद्यामागे 9 महिन्यांची गरोदर असलेली ‘ईठा’ असह्य प्रसूतीकळा सोसत सादरीकरणाची तयारी करत असते. “या अवस्थेत नाचल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,” असा चेतावणीवजा इशारा पार्श्वभूमीत मिळत असतानाही, ती आपल्या कलेसाठी मंचावर उतरण्याचा धाडसी निर्णय घेते. बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच ती पुन्हा मंचावर येऊन सादरीकरण करते, हा क्षण अंगावर काटा आणणारा आहे.

हेही वाचा – Eetha Movie: प्रसूतीकळा तरी पाय थांबले नाहीत! ‘ईठा’ चित्रपटाचा काळीज पिळवटून टाकणारा टीझर सोशल मीडियावर व्हायरल; श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर वाढवली होती उत्सुकता

हा टीझर रिलीज करण्यापूर्वी श्रद्धा कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून चित्रपटाचे 2 आकर्षक पोस्टर्स शेअर केले होते, ज्यामध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या रूपातील तिची झलक पाहायला मिळाली होती. हे पोस्टर्स शेअर करताना तिने, “तयार राहा… ‘ईठा’ येत आहे. टीझर 2 तासांत प्रदर्शित होईल,” अशी कॅप्शन देत चाहत्यांची धडधड वाढवली होती. विशेष म्हणजे, 19 जून रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेल्या शाहिद कपूर, कृती सनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘कॉकटेल 2’ या चित्रपटासोबतच ‘ईठा’चा हा टीझर थिएटर्समध्ये दाखवण्यात आला होता. रुपेरी पडद्यावर श्रद्धाचे हे लावणी सम्राज्ञीचे रूप पाहून प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज
या चित्रपटात केवळ श्रद्धा कपूरच नाही, तर तिच्यासोबत अष्टपैलू अभिनेते रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्युब हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. कला क्षेत्रासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या एका महान गायिकेचे आणि नृत्यांगनेचे वादळी आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. हा बहुप्रतिक्षित बायोपिक 28 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number