KBC 18 Premiere: ‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या प्रीमियरची तारीख जाहीर; अमिताभ बच्चन यांचे धमाकेदार पुनरागमन

चाहत्यांची उत्सुकता वाढवत निर्मात्यांनी 'कौन बनेगा करोडपती 18' ची प्रीमियर तारीख जाहीर केली आहे.

KBC 18 Premiere: ‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या प्रीमियरची तारीख जाहीर; अमिताभ बच्चन यांचे धमाकेदार पुनरागमन

KBC 18 premiere: छोटे पडदे गाजवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ आपल्या 18 व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांचे ‘हॉट सीट’वर स्वागत करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मात्र, यंदाची स्पर्धा पूर्वीसारखी सोपी असणार नाही. सोनी टीव्हीने नुकत्याच जारी केलेल्या प्रोमोजनुसार, या सीझनमध्ये स्पर्धकांच्या केवळ सामान्य ज्ञानाचीच नव्हे, तर त्यांच्या आकलनशक्तीची आणि चिकित्सक विचारसरणीची (Critical Thinking) खरी परीक्षा घेतली जाणार आहे.

हेही वाचा – Aamir Khan : ‘तिसरं लग्न करून लव्ह जिहाद केला’, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा आरोप; आमिर खानला दिली जीवे मारण्याची धमकी

10 ऑगस्टपासून सुरू होणार ज्ञानाचा महाखेळ 
चाहत्यांची उत्सुकता वाढवत निर्मात्यांनी ‘कौन बनेगा करोडपती 18’ ची प्रीमियर तारीख जाहीर केली असून हा शो 10 ऑगस्ट 2026 पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. चॅनेलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या वेगवेगळ्या प्रोमोजमधून या सीझनमध्ये येणाऱ्या मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये ‘बिग बी’ म्हणतात की, यंदाच्या केबीसीसाठी केवळ इतिहास, क्रीडा किंवा विज्ञानाचे पाठांतर करून चालणार नाही, कारण खेळाचे नियम बदलले आहेत. दुसऱ्या प्रोमोमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उल्लेख करत, बदलत्या जगासोबत शोच्या स्वरूपातही बदल करणे कसे गरजेचे होते, यावर प्रकाश टाकला आहे. तर तिसऱ्या प्रोमोमध्ये आजकाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लोकांच्या मोबाईल फोनमध्ये सहज उपलब्ध असल्याचे सांगत, यावेळी केवळ उत्तर देणे पुरेसे नसून त्यामागील तर्कावर विचार करावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे
टीव्ही जगतात ‘केबीसी 18’ च्या माध्यमातून व्यस्त असणारे अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीतही तितकेच सक्रिय आहेत. सध्या त्यांचे दोन मोठे चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत असून त्यांची अधिकृत घोषणा झालेली आहे. यामध्ये ‘सेक्शन 84’ आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या ‘कल्की 2898 एडी’ या सिनेमाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेलचा समावेश आहे. या दोन्ही प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून ‘बिग बी’ लवकरच मोठ्या पडद्यावरही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number