Monali Thakur : मोनाली ठाकूरची हिऱ्याची अंगठी पडली कचऱ्याच्या डब्यात; स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितला मजेशीर अनुभव

हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यासाठी मोनालीला थेट विमानतळावरील कचऱ्याच्या डब्यात चढावे लागले. ही घटना तिने स्वतः व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Monali Thakur : मोनाली ठाकूरची हिऱ्याची अंगठी पडली कचऱ्याच्या डब्यात; स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितला मजेशीर अनुभव

Monali Thakur Viral Video: प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर सध्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर असून, झुरिच विमानतळावर घडलेली एक अनोखी आणि मजेशीर घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यासाठी मोनालीला थेट विमानतळावरील कचऱ्याच्या डब्यात चढावे लागले. पहाटे 4 वाजता घडलेली ही घटना तिने स्वतः व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोनाली ठाकूर म्हणते की, ती झुरिच विमानतळावर कचरा टाकत असताना तिची नेहमी घालायची हिऱ्याची अंगठी चुकून कचऱ्यात पडली. “मी कचरा टाकत होते आणि त्याच वेळी माझी सुंदर हिऱ्याची अंगठी थेट कचऱ्याच्या डब्यात गेली. त्या वेळी पहाटे 4 वाजले होते आणि आजूबाजूला कोणीच नव्हते,” असे ती सांगते.

हेही वाचा – Dhurandhar Rapper Flipperachi : रहमान डकैतच्या एन्ट्रीचं रॅप गाणाऱ्याने अद्याप ‘धुरंधर’ पाहिलाच नाही; कारणही आलं समोर

अंगठी काढण्यासाठी मोनालीला मोठा संघर्ष करावा लागला. कचऱ्याची कचराकुंडी जड असल्याने ती उघडणे कठीण होते. “ती इतकी जड होती की मी एकटीने उघडू शकत नव्हते. आत काय आहे, हातात काय येईल याचीही कल्पना नव्हती,” असे तिने सांगितले. अखेर काही अनोळखी लोकांनी तिला मदत केली आणि त्यांच्या सहकार्याने मोनाली कचऱ्याच्या डब्यात उतरून आपली हिऱ्याची अंगठी सुरक्षितपणे परत मिळवू शकली.

हेही वाचा – Bharti Singh Second Baby : ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई! गोलाला भाऊ की बहीण…

दरम्यान, अलीकडेच मोनाली ठाकूर आरोग्याच्या कारणामुळेही चर्चेत होती. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान श्वास घेण्यास त्रास झाल्याने पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा येथे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यामुळे तिला शो अर्ध्यावर थांबवावा लागला आणि तिने प्रेक्षकांची माफीही मागितली होती. ‘इंडियन आयडल 2’ ची विजेती असलेल्या मोनाली ठाकूरने ‘सावर लून’, ‘मोह मोह के धागे’, ‘जरा जरा टच मी’ आणि ‘बद्री की दुल्हनिया’ यांसारख्या अनेक गाजलेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध भाषांतील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडमधील ही अनोखी घटना सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, मोनालीच्या प्रामाणिकपणा आणि मजेशीर शैलीचे चाहते कौतुक करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number