Madhuri Dixit : ‘मला राजकारणात काम…’; राजकीय प्रवेशाबद्दल माधुरी दीक्षितचं मोठ वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

अनेक नामवंत कलाकारांनी सिनेमा क्षेत्रातून राजकारणाची वाट धरल्याने माधुरीही हा मार्ग निवडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर अभिनेत्रीने स्वतः या चर्चांवर पडदा टाकला आहे.<br/>

Madhuri Dixit : ‘मला राजकारणात काम…’; राजकीय प्रवेशाबद्दल माधुरी दीक्षितचं मोठ वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यानेही लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांत तिच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांनी उधाण आणलं आहे. अनेक नामवंत कलाकारांनी सिनेमा क्षेत्रातून राजकारणाची वाट धरल्याने माधुरीही हा मार्ग निवडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर अभिनेत्रीने स्वतः या चर्चांवर पडदा टाकला आहे.

हेही वाचा – Samantha Ruth Prabhu Bhoot Shuddhi Marriage : समंथा 'भूत शुद्धी विवाह'पद्धतीने अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या विधीचे स्वरूप आणि महत्त्व

दरम्यान, ANI ला दिलेल्या एका खास मुलाखतीत माधुरीला थेट विचारण्यात आले की, ती राजकारणात येणार का? यावर उत्तर देताना माधुरी म्हणाली, “सध्या तरी मी अशा कोणत्याही निर्णयाबाबत ठाम नाही. राजकारण हे माझं क्षेत्र नाही आणि मी स्वतःला त्यात पाहतही नाही. मी कलाकार आहे आणि कला क्षेत्रात काम करत राहणं हाच माझा मार्ग आहे. कलाक्षेत्रात काही बदल घडवायचे असतील तर मी ते कलाकार म्हणूनच करेन.”

हेही वाचा – Biopic of V Shantaram: व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची घोषणा! चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; 'हा' अभिनेता साकारणार आयकॉनची भूमिका

माधुरी पुढे म्हणाली, “कलाकार म्हणून मला खूप समाधान मिळतं. राजकारणात येण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला माझ्या कलेच्या माध्यमातून मिळणारा प्रभाव जास्त महत्त्वाचा वाटतो आणि त्याच दिशेने मी पुढे जात राहणार आहे.” मोठ्या पडद्यावर यशस्वी प्रवास केल्यानंतर माधुरीने OTT विश्वाकडे वाटचाल केली आहे. अभिनेत्री लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या थ्रिलर-ड्रामा सीरिजमध्ये पाहायला मिळणार असून सध्या ती याच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. ही सिरिज 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यापासून थोडी दूर असली तरी माधुरी सतत चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिचा प्रभाव तितकाच मजबूत आहे आणि चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी ती नेहमीच फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number