Bhoot Bangla Release Date: अक्षय कुमारवर ‘धुरंधर’चा प्रभाव! ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता वापरणार ही रणनीती

बॉक्स ऑफिसवर सध्या सुरू असलेली 'धुरंधर 2'ची क्रेझ आणि व्यापार विश्लेषकांचा सल्ला लक्षात घेऊन, 'भूत बंगला'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Bhoot Bangla Release Date: अक्षय कुमारवर ‘धुरंधर’चा प्रभाव! ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता वापरणार ही रणनीती

Bhoot Bangla Release Date:  बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन ही सुपरहिट जोडी तब्बल 14 वर्षांनंतर ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असतानाच, निर्मात्यांनी प्रदर्शनाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या सुरू असलेली ‘धुरंधर 2’ची क्रेझ आणि व्यापार विश्लेषकांचा सल्ला लक्षात घेऊन, ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट एका नवीन रणनीतीसह प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘पेड प्रिव्ह्यू’ची नवी चाल
यापूर्वी हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता; मात्र आता निर्मात्यांनी ‘धुरंधर 2’ प्रमाणेच ‘पेड प्रिव्ह्यू’ची (Paid Previews) रणनीती स्वीकारली आहे. नव्या बदलानुसार, 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:00 वाजल्यापासून चित्रपटाचे विशेष शो सुरू होतील. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रेक्षकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्यासाठी हा सहा दिवसांचा बदल करण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांना आता थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी चित्रपटाला मिळणारी स्क्रीन संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एकता कपूरचे स्पष्टीकरण: चित्रपटसृष्टीच्या हिताचा निर्णय
चित्रपटाची निर्माती एकता कपूरने या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली, “आमचे वितरण भागीदार आणि चित्रपटगृह मालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. सध्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कामगिरी करत आहे, जी उद्योगासाठी आनंदाची बाब आहे. आमच्या चित्रपटगृह मालकांना असे वाटते की, ‘भूत बंगला’ला प्रदर्शनासाठी एक पूर्ण आणि निर्विघ्न आठवडा मिळणे आवश्यक आहे. हा निर्णय निर्माते, प्रदर्शक आणि प्रेक्षक अशा सर्वांसाठीच महत्त्वाचा ठरेल.” प्रेक्षकांना कोणताही तडजोड न करता चित्रपटाचा आनंद घेता यावा, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे तिने नमूद केले.

हेही वाचा – Tamil Nadu Elections 2026 : तमिळनाडूच्या राजकारणात ‘थलापती’ची एन्ट्री; विजय यांनी त्रिची मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

अक्षय-प्रियदर्शन जोडीचा धमाका
‘भूत बंगला’च्या निमित्ताने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीने यापूर्वी अनेक क्लासिक विनोदी चित्रपट दिले आहेत. ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ आणि ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव, जिष्णू सेनगुप्ता आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे आता 16 एप्रिलच्या रात्रीपासून या ‘भूत बंगला’चे दरवाजे प्रेक्षकांसाठी उघडले जातील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number