Mumbai Drugs Case: Mumbai Drugs Case: 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ऑरीची मुंबई पोलिसांकडून आज पुन्हा चौकशी; 5 तासांच्या चौकशीत सिद्धांत कपूरला विचारले ‘हे’ प्रश्न

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याला अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटकडून दुसरे समन्स बजावल्यानंतर तो बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिला.

Mumbai Drugs Case: Mumbai Drugs Case: 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ऑरीची मुंबई पोलिसांकडून आज पुन्हा चौकशी; 5 तासांच्या चौकशीत सिद्धांत कपूरला विचारले ‘हे’ प्रश्न

Mumbai Drugs Case: 252 कोटी रुपयांच्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याला अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटकडून दुसरे समन्स बजावल्यानंतर तो बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिला. ANC कार्यालयाबाहेर ओरीला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सिद्धांत कपूरची पाच तास चौकशी

याआधी मंगळवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर ANC समोर चौकशीसाठी हजर झाला होता. दुपारी 1 वाजता सुरु झालेली चौकशी तब्बल पाच तास चालली. सूत्रांनुसार, चौकशीदरम्यान सिद्धांतला 11 महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले, ज्यात त्याचे विदेश दौरे, दुबईतील पार्टी, ड्रग्ज संबंध, सलीम आणि ताहिर डोला यांच्याशी संपर्क यांचा समावेश होता.

हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी NIA ची कारवाई; दहशदवादी उमरला मदत करणारा शोएब अटकेत

सिद्धांत कपूरला विचारले गेलेले महत्त्वाचे 11 प्रश्न

सलमान सलीम शेखसोबत तुमचे संबंध कसे आणि किती वर्षांचे?
तुम्ही त्याला पहिल्यांदा कधी आणि का भेटलात?
गेल्या पाच वर्षांत तुम्ही किती वेळा परदेशात गेला आहात?
दुबईला किती वेळा भेट दिली?
दुबईत कुठे राहिलात? कोणाला भेटलात?
दुबईत तुम्ही ड्रग्ज पार्टी आयोजित केली होती का?
दुबईत मुंबईतील कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्यावसायिकाला भेटलात का?
ताहिर डोलाला तुम्ही भेटला आहात का?
तुम्ही कधी ड्रग्ज घेतले आहेत का?
तुम्ही कधी ड्रग्जसाठी सलमान शेखशी व्यवहार केला आहे का?
तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये कधी सलीम किंवा ताहिरशी जोडलेल्या कोणत्याही खात्यात किंवा त्यातून पैशांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे का?

हेही वाचा – Crime News: ऐकावं ते नवलच! पुण्यात महिलेनं पुरुषावर केला अत्याचार आणि नंतर फोटो काढून…

ओरीला दुसऱ्यांदा समन्स  

ANC ने यापूर्वी देखील ओरीला समन्स बजावले होते, परंतु तो चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. दुसऱ्या समन्सनुसार, त्याला 26 नोव्हेंबर रोजी हजर राहणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर ओरी ANC कार्यालयात उपस्थित राहिल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. ड्रग्ज तस्कर सलीम डोला याचा मुलगा ताहिर डोलाचे ऑगस्टमध्ये दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तपासकर्त्यांना सांगितले की, भारत आणि विदेशात 'ड्रग्ज पार्ट्या' आयोजित केल्या जात होत्या. या पार्ट्यांना बॉलिवूड अभिनेते, मॉडेल, रॅपर, चित्रपट निर्माते आणि अंडरवर्ल्डशी संबंधित लोक उपस्थित असतं. या पार्ट्यांमध्ये मेफेड्रोन (MD) पुरवले जात असे.  ताहिरने ज्यांची नावे घेतली त्यात श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, नोरा फतेही, ओरहान अवत्रमणी (ओरी), अब्बास–मस्तान, रॅपर लोका, झीशान सिद्दीकी, अलिशा पारकर (हसीना पारकरचा मुलगा अशी काही मोठी आणि विवादग्रस्त नावे समाविष्ट आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number