हिंदुद्वेषी वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरलेले MIM चे नेते आणि असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना आक्षेपार्ह विधानं केली. हैदराबादेत एका सभेला संबोधित करताना ओवैसीने CAA वर टीका केली. यावेळी नागरिकत्वाचा पुरावा मागणाऱ्याना जबाब देताना ‘आम्ही 800 वर्षं तुमच्यावर राज्य केलंय, याहून काय मोठा पुरावा हवा?’ असा प्रक्षोभक सवाल त्यांनी केलाय .
‘आम्ही भारतावर 800 वर्ष राज्य केलंय. त्यामुळे यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय हवा?’ असा प्रश्न नागरिकत्वाचा पुरावा मागणाऱ्या सरकारी प्रतिनिधींना करा’, असा सल्ला अकबरुद्दीनने आपल्या भाषणात दिलाय.
CAA ला कुणीही घाबरून जायची गरज नाही, असं म्हणत भारत हा आमचा देश होता, आहे आणि राहिल, असा दावा ओवैसीने केलाय.
माझ्या बापजाद्यांनी भारताला कुतुब मीनार, चारमीनार जामा मशिद दिली. जो चारमीनार उभा आहे, तो आमच्या पूर्वजांनी बनवला आहे, तुमच्या बापजाद्यांनी नाही, असं तुम्ही कागदपत्रांची मागणी करणाऱ्यांना सांगा, अशा शब्दांत ओवैसीने सभेला डिवचलं.
पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवतात, तो ‘लाल किल्ला’ देखील आमच्याच बापजाद्यांनी दिलाय, याची आठवण ओवैसीने करून दिली.
ओवैसीच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
दरम्यान देशात सीएए विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळणही लागलं.