Lara Dutta: अभिनेत्री लारा दत्ता मुलीसह दुबईत अडकली; व्हिडीओ शेअर करत सांगितला थरार

एका भावनिक व्हिडिओद्वारे तिने स्पष्ट केले की, स्फोट आणि क्षेपणास्त्रांच्या आवाजांमुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक तणावात आहे.<br/>

Lara Dutta: अभिनेत्री लारा दत्ता मुलीसह दुबईत अडकली; व्हिडीओ शेअर करत सांगितला थरार

Lara Dutta: पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावाचा फटका आता सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता भूपती सध्या तिच्या मुलीसोबत दुबईत अडकली असून तिने तेथील अत्यंत भयावह परिस्थितीचा अनुभव शेअर केला आहे. एका भावनिक व्हिडिओद्वारे तिने स्पष्ट केले की, स्फोट आणि क्षेपणास्त्रांच्या आवाजांमुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक तणावात आहे.

लारा दत्ताने 28 फेब्रुवारी रोजी घडलेल्या थरारक घटनेची आठवण करून दिली. ती एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना अचानक मोठे स्फोट झाले आणि लोक जीवाच्या आकांताने बाहेर पळाले. “आकाशात जेट विमाने उडत होती आणि क्षेपणास्त्रे रोखली जात असल्याचे दिसत होते. स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की माझ्या व्हिलाच्या खिडक्या आणि दरवाजेही थरथर कापत होते,” असे लाराने सांगितले. पती महेश भूपती कामासाठी बाहेर असल्याने, या संकटकाळात मुलगी सायराची एकटीने काळजी घेणे तिच्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे.

यूएई सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास
भयावह परिस्थिती असूनही लाराने संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले आहे. परिस्थिती चिंताजनक असली तरी तिला तेथे असुरक्षित वाटले नाही. “यूएई सरकार आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही कोणत्याही देशातून आलेलो असलो, तरी आम्हाला येथे तितकेच सुरक्षित वाटते जितके भारतात वाटते,” अशा शब्दांत तिने प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – Sonu Sood Is Savior: दुबईत अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी सोनू सूद बनला देवदूत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘ फक्त एक मेसेज…’

सामान्य लोकांचे धाडस आणि मायदेशी परतण्याची ओढ
लाराने आपल्या व्हिडिओमध्ये अशा सामान्य लोकांबद्दल आणि डिलिव्हरी रायडर्सबद्दल आदर व्यक्त केला, जे युद्धासारख्या परिस्थितीतही आपली कर्तव्ये बजावत आहेत. ज्यांना इतरत्र जाण्यासाठी जागा नाही, त्यांच्याबद्दल तिने हळहळ व्यक्त केली. सध्या लारा आणि तिची मुलगी भारतात परतण्यासाठी विमानांच्या तिकिटांचा शोध घेत आहेत. परिस्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, अशी आशा तिने व्यक्त केली असून या प्रदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांची चिंता तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number