दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ईडीने ही कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी केजरीवाल यांच्या वकिलाकडून एक अर्ज देण्यात आला आहे. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच केजरीवाल यांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनाच्या घोषणा करत असलेल्या काही जणांना पोलिसांनी पकडले […]

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ईडीने ही कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी केजरीवाल यांच्या वकिलाकडून एक अर्ज देण्यात आला आहे. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच केजरीवाल यांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनाच्या घोषणा करत असलेल्या काही जणांना पोलिसांनी पकडले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याआधी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने केसीआरच्या मुलीला अर्थात तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला अटक केली. सध्या के. कविता ईडी कोठडीत आहे. भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि तेलंगण सरकारची माजी मंत्री के. कविताला दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी ईडी कोठडी दिली. यानंतर कविताने दिलेली माहिती आणि हाती आलेले पुरावे याच्या आधारे ईडीने कारवाई सुरू केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number