SC On Civil Servants Dispute: ‘स्वतःचेच भविष्य धोक्यात आणताय…’; IAS-IPS महिला अधिकाऱ्यांच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा संताप; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा

आयएएस (IAS) अधिकारी रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस (IPS) अधिकारी रुपा मुदगिल यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

SC On Civil Servants Dispute: ‘स्वतःचेच भविष्य धोक्यात आणताय…’; IAS-IPS महिला अधिकाऱ्यांच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा संताप; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा

IAS vs IPS: कर्नाटक केडरच्या दोन अत्यंत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलह आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. आयएएस (IAS) अधिकारी रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस (IPS) अधिकारी रुपा मुदगिल यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "एकमेकांविरोधात कायदेशीर संघर्ष करून तुम्ही दोघी स्वतःचेच प्रशासकीय करिअर उद्ध्वस्त करत आहात," अशा कडक शब्दांत न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना सुनावले. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी न्यायालयाने आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्याकडे मध्यस्थीची जबाबदारी सोपवली आहे.

2023मधील 'त्या' सोशल मीडिया पोस्टमुळे पेटला होता वाद

या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील वादाची ठिणगी फेब्रुवारी 2023 मध्ये पडली. आयपीएस रुपा मुदगिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयएएस रोहिणी सिंदुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याचे गंभीर आरोप करत अनेक पोस्ट केल्या होत्या. याविरोधात रोहिणी सिंदुरी यांनी कायदेशीर पाऊल उचलत न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने रुपा यांना अशा प्रकारच्या पोस्ट करण्यापासून रोखले होते.

हायकोर्टानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 

कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आयपीएस रुपा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली होती, परंतु तिथे त्यांची याचिका फेटाळली गेली. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत, सत्र न्यायालयात दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यांवरील सुनावणीला स्थगिती दिली आहे आणि त्यांना आपापसातील मतभेद मिटवण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा – Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; दुबईहून आलेल्या विमानाच्या शौचालयातून 4 कोटींचे सोने जप्त

जुलै महिन्यात होणार सुनावणी; वकिलांचीही सहमती

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना वादावर पडदा टाकण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्यास सांगितले असून, वकिलांनीही याला मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, रोहिणी सिंदुरी आणि रुपा मुदगिल या दोघींनाही येत्या जुलै महिन्यात निवृत्त न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यासमोर हजर राहावे लागणार आहे. आता या दोन बड्या अधिकाऱ्यांमधील हा दीर्घकालीन वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सुटणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number