PIB Fact Check: बँकेतून 1 लाख काढण्यासाठी लागणार 7500 रुपयांचा टॅक्स? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागील सत्य काय?

यापूर्वीही अशाच प्रकारे 1 लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी आधी 7,500 रुपये कर भरण्याची मागणी करणारे बनावट ईमेल नागरिकांना पाठवून त्यांच्यावर तातडीने पैसे भरण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे समोर आले आहे.<br/>

PIB Fact Check: बँकेतून 1 लाख काढण्यासाठी लागणार 7500 रुपयांचा टॅक्स? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागील सत्य काय?

PIB Fact Check: सोशल मीडियावर सध्या आरबीआयच्या (RBI) नावाने एक बनावट पत्र आणि संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या संदेशांमध्ये नागरिकांना त्यांच्या खात्यात 1,06,800 रुपये जमा होणार असल्याचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, हा व्यवहार यशस्वी करण्यासाठी आधी 'परतावायोग्य कर' (रिफंडेबल टॅक्स) म्हणून 17,500 रुपये एका विशिष्ट बँक खात्यात भरण्यास सांगितले जाते. पैसे भरताच अवघ्या 10 मिनिटांत सर्व रक्कम खात्यात येईल, असा दावा या पत्रात केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे 1 लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी आधी 7,500 रुपये कर भरण्याची मागणी करणारे बनावट ईमेल नागरिकांना पाठवून त्यांच्यावर तातडीने पैसे भरण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे समोर आले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा 
दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या व्हायरल दाव्याची पडताळणी केली. या पडताळणीत हे पत्र पूर्णपणे बोगस आणि फसवणूक करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी थेट बँक खाते चालवत नाही. तसेच लॉटरी, बक्षीस किंवा कोणताही अडकलेला निधी बँक खात्यात जमा करण्यासाठी आरबीआय कधीही फोन, एसएमएस, पत्र अथवा ईमेलद्वारे आगाऊ कर किंवा कोणतेही शुल्क भरण्याची मागणी करत नाही. त्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या नावाने फिरणारे हे संदेश पूर्णपणे खोटे आहेत.

हेही वाचा – Aamir Khan : 'तिसरं लग्न करून लव्ह जिहाद केला', लॉरेन्स बिश्नोई टोळीचा आरोप; आमिर खानला दिली जीवे मारण्याची धमकी

सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा:

अनोळखी खात्यात व्यवहार टाळा: आरबीआय किंवा कोणत्याही बँकेच्या नावाने आधी पैसे भरण्यास सांगणाऱ्या संदेशांवर किंवा कॉलवर चुकूनही विश्वास ठेवू नका आणि पैसे पाठवू नका.

अनाधिकृत लिंक्सवर क्लिक करू नका: लॉटरी लागल्याचे किंवा निधी जमा झाल्याचे सांगणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.

अधिकृत माहितीचाच वापर करा: बँकेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती किंवा नियमांची खातरजमा केवळ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच (Website) करा.

सायबर पोलिसांशी साधा संपर्क: तुम्हाला अशा प्रकारचा संशयास्पद मेसेज आल्यास किंवा तुमची फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर (Cyber Crime Portal) तक्रार नोंदवा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number