IPL 2026 Loan Rule: RCB चा खेळाडू CSK साठी खेळणार ? चेन्नईच्या माजी खेळाडूच्या पोस्टने खळबळ

महेंद्रसिंह धोनीची तंदुरुस्ती आणि आयुष म्हात्रेची दुखापत यामुळे संघ चिंतेत असतानाच, अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

IPL 2026 Loan Rule: RCB चा खेळाडू CSK साठी खेळणार ? चेन्नईच्या माजी खेळाडूच्या पोस्टने खळबळ

IPL 2026 Loan Rule:  आयपीएल 2026 चा हंगाम मध्यावर आलेला असताना चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. महेंद्रसिंह धोनीची तंदुरुस्ती आणि आयुष म्हात्रेची दुखापत यामुळे संघ चिंतेत असतानाच, अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आयुष म्हात्रेच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) एक युवा खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात सामील होऊ शकतो, असे संकेत अश्विनने दिले आहेत.

अश्विनची 'ती' पोस्ट आणि लोन विंडोची चर्चा
सलामीवीर आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर चेन्नईला सक्षम पर्यायाची गरज आहे. यावर भाष्य करताना अश्विनने आयपीएलमधील 'लोन' (Loan) नियमाची आठवण करून दिली. अश्विनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "अनेक खेळाडू जखमी होत आहेत. 7 व्या सामन्यानंतर लोन विंडो बंद होईल. अशा वेळी आरसीबीच्या विहान मल्होत्राला चेन्नईने उधारीवर (Loan) घेणे ही उत्तम कल्पना ठरू शकते." विहान व्यतिरिक्त त्याने अभिज्ञान कुंडू या डावखुऱ्या खेळाडूचे नावही सुचवले आहे.

नेमकं काय आहे 'लोन' समीकरण?
आयपीएलच्या नियमानुसार, एखादा संघ आपल्या खेळाडूला दुसऱ्या संघाला उर्वरित हंगामासाठी 'भाड्याने' देऊ शकतो. मात्र, यासाठी काही अटी आहेत. ज्या खेळाडूने चालू हंगामात एकही सामना खेळलेला नाही, त्यालाच लोनवर पाठवता येते. लोनवर गेलेला खेळाडू उत्तरार्धात आपल्या मूळ संघाविरुद्ध (उदा. विहान आरसीबीविरुद्ध) खेळू शकणार नाही. ही प्रक्रिया सातव्या सामन्यापर्यंत पूर्ण करणे आवश्यक असते.

हेही वाचा – Unrecognized League Goa: BCCI शी पंगा महागात पडला! अमान्य लीगमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियन-इंग्लिश खेळाडूंना मोठा फटका

कोण आहे विहान मल्होत्रा?
विहान मल्होत्रा हा नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. आरसीबीने त्याला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले आहे, परंतु स्टार खेळाडूंच्या गर्दीत त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. चेन्नईला सध्या एका आक्रमक सलामीवीराची गरज असल्याने विहान त्यांच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. आता अश्विनचा हा सल्ला चेन्नई व्यवस्थापन गांभीर्याने घेणार का आणि आरसीबी आपल्या या युवा प्रतिभेला 'यलो आर्मी'कडे सोपवणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number