Crime News: क्रूरतेची परिसीमा! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं; पतीने सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला लेकीचा करुण अंत

सततच्या कौटुंबिक कलहाला कंटाळून माहेरी गेलेल्या अवघ्या 23 वर्षांच्या भाग्यश्री जिगळूर या तरुणीला तिच्याच पतीने निर्घृणपणे संपवलं.

Crime News: क्रूरतेची परिसीमा! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं; पतीने सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला लेकीचा करुण अंत

Crime News: मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात समोर आली आहे. सततच्या कौटुंबिक कलहाला कंटाळून माहेरी गेलेल्या अवघ्या 23 वर्षांच्या भाग्यश्री जिगळूर या तरुणीला तिच्याच पतीने निर्घृणपणे संपवलं. चारित्र्यावर घेतलेल्या संशयाच्या भूत मानगुटीवर बसल्याने आरोपी प्रवीण जिगळूर याने अत्यंत अमानुषपणे पत्नीचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

माहेरून परतताच रचला मृत्यूचा पाश

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याने भाग्यश्री गेल्या 2 महिन्यांपासून माहेरी राहत होती. मात्र, 'पुढे त्रास देणार नाही' असे आश्वासन प्रवीणने दिल्यानंतर ती रविवारीच आपल्या सासरी परतली होती. परंतु, घरात पाऊल ठेवताच काही वेळातच आरोपीने तिच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला चढवला. मारहाणीनंतर त्याने तिला घरातच गळफास लावून संपवण्याचा कट अमलात आणला.

सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला मुलीचा शेवटचा श्वास

या हत्येमागील क्रूरतेची पराकाष्ठा म्हणजे, भाग्यश्री गळफास लागल्यानंतर जेव्हा जिवाच्या आकांताने तडफडत होती, तेव्हा तिला वाचवण्याऐवजी आरोपी पतीने मोबाईल काढून घटनेचे चित्रीकरण सुरू केले. एवढ्यावरच न थांबता त्याने थेट सासुरवाडीला व्हिडिओ कॉल करून तिच्या आई-वडिलांना पोटच्या गोळ्याचा तडफडून होणारा अंत थेट दाखवला. हा क्लिप त्याने इतर नातेवाईक आणि मित्रांनाही पाठवून विकृत आनंद साजरा केला.

हेही वाचा – Mumbai ABC Action : टो केलेली कार सोडण्यासाठी केली 10 हजारांची मागणी; ACB नं रचला सापळा, दोघांना घातल्या बेड्या

आरोपी पती अटकेत; बिलगी पोलिसांकडून सखोल तपास

मुलीचा छळ आणि गुन्ह्याचा प्रकार समोर आल्यानंतर सुन्न झालेल्या कुटुंबाने तत्काळ पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बिलगी पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रवाना केला. या धक्कादायक प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पती प्रवीण जिगळूर याला गजाआड केले असून, या कृत्यामागे आणखी काही षड्यंत्र आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number