Crime News : अबब! बस ड्रायव्हरच्या घरावर पोलिसांचा छापा अन् तब्बल 50 कोटींची जप्ती! 5 नोट मोजणी मशीन्स बंद पडल्याने उडाली खळबळ

रात्रीपासून सुरू झालेली नोटांची मोजणी सलग अनेक तास सुरू होती. प्रचंड प्रमाणात रोख रक्कम असल्यामुळे मोजणीदरम्यान 5 करन्सी काउंटिंग मशिन्स नादुरुस्त झाल्या.

Crime News : अबब! बस ड्रायव्हरच्या घरावर पोलिसांचा छापा अन् तब्बल 50 कोटींची जप्ती! 5 नोट मोजणी मशीन्स बंद पडल्याने उडाली खळबळ

West Bengal Birbhum Bus Driver House Police Raid : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी टाकलेल्या एका धडक छाप्यामध्ये 28.5 कोटी रुपयांची रोकड आणि तब्बल 15 किलो सोन्याचे बार व बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य जवळपास 21.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, संपूर्ण जप्तीचा आकडा तब्बल 50 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. रात्रीपासून सुरू झालेली नोटांची मोजणी सलग अनेक तास सुरू होती. प्रचंड प्रमाणात रोख रक्कम असल्यामुळे मोजणीदरम्यान 5 करन्सी काउंटिंग मशिन्स नादुरुस्त झाल्या, ज्यामुळे पोलिसांना बँकेतून अतिरिक्त यंत्रे मागवावी लागली होती.  

माजी सरकारी बस ड्रायव्हर मिनार मंडलला अटक
मोहम्मद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत देउचा गावात केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी मिनार मंडल याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. मिनार मंडल हा पूर्वी उत्तर बंगाल राज्य परिवहन मंडळात बस चालक म्हणून कार्यरत होता आणि 2017 मध्ये त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो दगड आणि वाळूच्या अवैध व्यवसायात सक्रिय झाला. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व पैसे आणि सोने त्याचा मेहुणा तथा फरार दगड व्यावसायिक तुलू मंडल ऊर्फ मोहम्मद नजीबुद्दीन याचे असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.  

100 कोटींच्या विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आलेला मेहुणा तुलू मंडल
तुलू मंडल हा बीरभूम जिल्ह्यातील स्टोन क्वारी आणि वाळू उपशाचा मोठा व्यावसायिक मानला जातो. 2024 मध्ये त्याने आपल्या मुलीच्या विवाहसोहळ्यावर सुमारे 100 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला गेला होता, ज्या सोहळ्याला बॉलिवूड आणि बंगाली कलाकारांनी हजेरी लावली होती. तो यापूर्वी 2022 मध्ये सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) रडारवर आला होता. देउचा परिसरातील टोल नाक्यांवरून दगड वाहतूक करणाऱ्या ट्रक्सकडून महसूल वसुलीची जबाबदारी त्याने मिनार मंडलकडे दिली होती. इथूनच या अवैध पैशांची साठेबाजी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Nitin Gadkari : E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होणार का? नितीन गडकरींनी संसदेत स्पष्टच सांगितलं

सरकारी महसूल अपहार आणि सिंडिकेट राजवर पोलिसांचा संशय
दगड खाणी आणि वाळू माफियांच्या बेकायदेशीर सिंडिकेटमधून गोळा झालेला सरकारी महसूल तिजोरीत जमा न करता त्याचा अपहार करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आधीच्या काळात महसूल वसुलीत मोठी अनियमितता झाली असून, कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला गेल्याचा संशय आहे. या संपूर्ण गैरव्यवहारात आणखी कोणकोणत्या मोठ्या व्यक्ती किंवा राजकीय हस्तकांचा समावेश आहे, याचा सखोल शोध आता पोलीस आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ अन् वाळू माफियांविरोधात झिरो टॉलरन्सचा इशारा  
या मोठ्या कारवाईचे स्वागत करत विरोधी पक्षनेते आणि अधिकाऱ्यांनी वाळू तसेच स्टोन माफियांविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवण्याचा पुनरुच्चार केला आहे. जनतेची संपत्ती लुटणाऱ्या कोणत्याही माफियांना किंवा भ्रष्ट सिंडिकेटला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

हेही वाचा – Amravati ST bus Accident : चालक केबिनमध्ये अडकला, ट्रकची काच फोडून….; अमरावतीत एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक! 10 जण गंभीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number