Gold Silver Rates Today: अमेरिका-इराण यांच्यामधील तणावाचा सराफ बाजारावर परिणाम; सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या ताजे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताज्या घडामोडींनंतर बाजारात नाट्यमय बदल पाहायला मिळत असून सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

Gold Silver Rates Today: अमेरिका-इराण यांच्यामधील तणावाचा सराफ बाजारावर परिणाम; सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या ताजे दर

Gold Silver Rates Today: मध्यपूर्व आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीचा आणि अमेरिका-इराणमधील ताज्या लष्करी संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेसह भारतीय सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील शांतता कराराच्या शक्यता धुळीस मिळाल्या आहेत. या वाढत्या भूराजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला मोठी अनिश्चितता पसरली होती आणि किमतींनी उच्चांक गाठला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताज्या घडामोडींनंतर बाजारात नाट्यमय बदल पाहायला मिळत असून सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण नोंदवली गेली आहे. अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढलेला असतानाच बाजारातील नफावसुली आणि इतर आर्थिक घटकांमुळे सोन्याच्या दरात तब्बल 2,000 ची तर चांदीच्या दरात विक्रमी 10,000 ची मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोने 1,55,000 वर तर चांदी 2,65,000 प्रति किलोवर
या मोठ्या घसरणीनंतर सराफा बाजारातील सोन्या-चांदीचे नवे दर सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ताज्या पडझडीमुळे आता सोन्याचे दर 155,000 प्रति 10 gram वर आले आहेत, तर GST सह हा दर 161,000 प्रति 10 gram वर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात झालेल्या 10 हजारांच्या मोठ्या घसरणीमुळे चांदीचे दर आता थेट 265,000 प्रति किलोवर खाली आले आहेत, तर GST सह चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 270,000 प्रति किलो मोजावे लागत आहेत.  यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा सरासरी दर 158,440 (GST शिवाय) च्या ऐतिहासिक पातळीवर होता, ज्यामध्ये आता मोठी कपात झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर आणि चेन्नई या प्रमुख शहरांमधील दरांवरही या घसरणीचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Domestic Flight Cuts: हवाई प्रवास महागणार? 1 जूनपासून एअर इंडिया आणि इंडिगोच्या उड्डाणांमध्ये कपात; मोठं कारण समोर

जागतिक कमोडिटी बाजारातील चढ-उतारांची मुख्य कारणे
सराफा बाजारात अचानक झालेल्या या मोठ्या घसरणीमागे आणि चढ-उतारांमागे जागतिक स्तरावरील 3 प्रमुख कारणे असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिले कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक चिघळल्याने निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, ज्यामुळे सुरुवातीला डॉलर आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. दुसरे कारण म्हणजे शेअर बाजार आणि इतर जागतिक वित्तीय क्षेत्रांमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नफावसुली सुरू केली आहे, ज्यामुळे दरात घट झाली. 

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) आगामी आर्थिक धोरणांविषयी बाजारात असलेले अंदाज, ज्याचा थेट परिणाम रुपया आणि डॉलरच्या मूल्यावर होत असून आयात शुल्कात बदल पाहायला मिळत आहेत. आखाती देशांमधील ही धुमसती परिस्थिती अशीच राहिली, तर आगामी काळात मौल्यवान धातूंच्या दरात आणखी अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number