हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाशेजारी बसून दोन चिमुकल्यांचं रडणं; बिहार रेल्वे स्थानकावरील काळीज पिळवटून टाकणारं दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

स्थानकावरील एका बाकावर एका महिलेचा मृतदेह आढळला असून, तिच्या शेजारी तिची दोन लहान मुले ओक्साबोक्शी रडताना दिसली. या दृश्याने स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.<br/>

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाशेजारी बसून दोन चिमुकल्यांचं रडणं; बिहार रेल्वे स्थानकावरील काळीज पिळवटून टाकणारं दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

Madhepura News:  बिहारमधील मधेपुरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. स्थानकावरील एका बाकावर एका महिलेचा मृतदेह आढळला असून, तिच्या शेजारी तिची दोन लहान मुले ओक्साबोक्शी रडताना दिसली. या दृश्याने स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

वडिलांनीच आईचा गळा दाबला; मुलांचा जबाब
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांकडे विचारपूस केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. मुलांनी मृत महिलेचे नाव काजल कुमारी आणि वडिलांचे नाव मोहम्मद मुर्शिद असल्याचे सांगितले. एका मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात असा दावा केला की, “वडिलांनी घरीच आईचा गळा दाबला, त्यानंतर तिला रिक्षात बसवून रेल्वे स्थानकावर आणले आणि तिचा मृतदेह येथे सोडून ते निघून गेले.”

गळ्यावर खुणा आणि घरगुती वादाची किनार
मधेपुरा जिल्ह्यातील जीतापूर येथील हे कुटुंब असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासादरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मृत महिलेच्या गळ्याभोवती साखळीच्या किंवा गळा आवळल्याच्या खुणा असल्याचे पाहिले आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार, काजल कुमारी ही गर्भवती होती आणि तिला आधीच दोन मुले होती. काही दिवसांपूर्वी तिचा पतीशी घरगुती कारणावरून वाद झाला होता, त्यानंतर तो कामावर निघून गेला होता.

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! 5 वर्षांच्या मुलाचं एक ‘खोटं बोलणं’ अन् पित्याला 23 वर्षांचा तुरुंगवास! पत्नी आणि 3 मुलांच्या हत्येचा आरोप; आता निर्दोष मुक्तता

पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती महिलेच्या माहेरच्या लोकांना दिली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण काय? ही हत्याच आहे का? हे आता शवविच्छेदन (Post-mortem) अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, पोटच्या मुलांनीच वडिलांवर आपल्या आईच्या हत्येचा आरोप केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number