Tourists Fined at Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याकडे रेल्वे रुळांवरून चालत जाणे पडले महागात; रेल्वे पोलिसांनी वसूल केला इतक्या हजारांचा दंड

नैऋृत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मार्गाने धबधब्याकडे जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे, तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली.

Tourists Fined at Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याकडे रेल्वे रुळांवरून चालत जाणे पडले महागात; रेल्वे पोलिसांनी वसूल केला इतक्या हजारांचा दंड

Tourists Fined at Dudhsagar Waterfalls : पावसाळ्यात निसर्गाचे विहंगम रूप पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दूधसागर धबधब्याकडे जाणे काही पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून रेल्वे रुळांवरून बेकायदेशीरपणे ट्रेकिंग करणाऱ्या 32 पर्यटकांवर रेल्वे संरक्षण दलाने (RPF) दणदणीत कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सर्व पर्यटकांकडून एकूण 16,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नैऋृत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मार्गाने धबधब्याकडे जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे, तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

कॅसलरॉक आरपीएफ पथकाची विशेष मोहीम
ही धडक कारवाई रविवारी (ता. 5) एका विशेष मोहिमेदरम्यान कॅसलरॉक येथील आरपीएफ उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरपीएफच्या विशेष पथकाने दूधसागर आणि सोनाली रेल्वेस्थानकांच्या दरम्यान अचानक तपासणी सुरू केली असता, 32 पर्यटक जंगलातून चोरट्या मार्गाने थेट रेल्वेरुळांवर प्रवेश करून धबधब्याकडे जाताना रंगेहात पकडले गेले. या सर्व हुल्लडबाज पर्यटकांवर रेल्वे कायद्याच्या कलम 147 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव युनिट आणि वास्को आरपीएफ पोस्टच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या मोहिमेवर थेट देखरेख ठेवली होती.

हेही वाचा – Nashik Cloudburst Warning : ढगफुटीसदृश्य पावसासाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्रीच 100 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पोलीस तैनात, अधिकारी अलर्ट

प्रत्येकाला 500 रुपयांचा फटका आणि रेल्वे प्रशासनाचे नियम
पकडण्यात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 500 रुपये दंड ठोठावण्यात आला, ज्यामुळे एकूण दंडाची रक्कम 16,000 रुपयांवर पोहोचली. पावसाळ्यात या घनदाट जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वे रुळांवरून चालणे अत्यंत धोकादायक असते. यामुळे केवळ पर्यटकांच्या जीवालाच धोका निर्माण होतो असे नाही, तर रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेलाही गंभीर बाधा पोहोचते. ज्येष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोककुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता या संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

स्वतःच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
दूधसागर धबधबा परिसराला घनदाट जंगलाचा वेढा असल्याने तेथे अपघाताचा धोका नेहमीच जास्त असतो. यापूर्वीही अनेकदा आवाहन आणि कारवाई करूनही पर्यटक लपूनछपून या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करत असल्याने प्रशासनाला सक्ती करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना कडक शब्दांत चेतावणी दिली आहे की, त्यांनी कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात किंवा रेल्वे रुळांवर बेकायदेशीरपणे प्रवेश करू नये आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

हेही वाचा – Kolhapur Rain update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! 54 बंधारे आणि 18 रस्ते पाण्याखाली; 250 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number