Gold : जगात जास्त सोनं असलेला देश कोणता? भारताचे स्थान आहे लक्षवेधी, जाणून घ्या आकडेवारी

भारतात सोनं म्हणजे केवळ गुंतवणूक नसून ती एक परंपरा आणि सणासुदीचा अविभाज्य भाग आहे. यामुळेच भारतातील सुवर्णसाठा हा संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा आणि कुतुहलाचा विषय आहे.

Gold : जगात जास्त सोनं असलेला देश कोणता? भारताचे स्थान आहे लक्षवेधी,  जाणून घ्या आकडेवारी

Top countries with highest gold reserves in 2026 : जगाच्या पाठीवर ज्या देशाकडे सोन्याचा साठा जितका मोठा, त्या देशाची अर्थव्यवस्था तितकीच मजबूत मानली जाते. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. अशा वेळी जगातील श्रीमंत देशांच्या तिजोरीत नक्की किती सोनं दडलंय आणि यात आपल्या भारताचे स्थान नेमके कुठे आहे, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

जगातील टॉप 5 सुवर्ण साठे (अधिकृत)
जागतिक स्तरावर सोन्याच्या अधिकृत साठ्याबाबत विचार केला, तर विकसित देशांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
अमेरिका: जागतिक अर्थव्यवस्थेचा 'किंग' असलेला अमेरिका 8133.5 टन सोन्यासह पहिल्या स्थानावर आहे.
जर्मनी: युरोपीय देशांमध्ये आघाडीवर असलेला जर्मनी 3350.3 टन सोन्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इटली आणि फ्रान्स: इटलीकडे 2451.8 टन तर फ्रान्सकडे 2437 टन सोन्याचा साठा असून त्यांनी तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.
रशिया: अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या रणनीतीमुळे रशियाने आपला साठा 2330 टनांच्या पुढे नेला आहे.

भारताचा क्रमांक आणि 'खरा' खजिना
जेव्हा आपण देशाच्या अधिकृत साठ्याचा विचार करतो, तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) सध्या सुमारे 880 टन सोनं जमा आहे. या आकडेवारीनुसार भारत जागतिक क्रमवारीत साधारण 9 व्या किंवा 10 व्या क्रमांकावर येतो. मात्र, खरी गंमत पुढे आहे. भारताचा हा अधिकृत सुवर्णसाठा म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे.

हेही वाचा – New Labour Code: सुट्ट्यांच्या बदल्यात आता खिशात येणार रोख पैसे; नवीन कामगार संहितेचा नोकरदारांना मोठा दिलासा

भारतीय घराघरांतलं 'सोनं' जगाला पाजणार पाणी!
भारतात सोनं म्हणजे केवळ गुंतवणूक नसून ती एक परंपरा आणि सणासुदीचा अविभाज्य भाग आहे. जर आपण भारतीय कुटुंबांकडे असलेल्या वैयक्तिक सोन्याचा विचार केला, तर सर्व जागतिक आकडेवारी फिकी पडते.
– अफाट साठा: एका अंदाजानुसार, भारतीय घराघरांत सामूहिकपणे सुमारे 25,000 टन सोनं दडलेलं आहे.
– जागतिक तुलना: हा आकडा अमेरिकेच्या अधिकृत साठ्यापेक्षाही तब्बल 3 पटीने जास्त आहे.
– महिलांची ताकद: या अफाट संपत्तीचा मोठा हिस्सा भारतीय महिलांच्या दागिन्यांच्या स्वरूपात असून हे 'स्त्रीधन' संकटाच्या काळात देशासाठी आणि कुटुंबासाठी मोठे सुरक्षा कवच ठरते. यामुळे भारतीय संस्कृतीत महिलांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं.

भारतीयांसाठी समृद्धीचे प्रतीक 
भारतात सुवर्णाला परंपरेत स्थान असणं ही बाब केवळ धार्मिक नसून या परंपरा मानवाच्या संपूर्ण जीवनाचा, व्यवहाराचा भाग असल्याचे लक्षात येते. अशा पद्धतीने सारासार विचार करून तयार झालेल्या परंपरा महान संस्कृतीचे लक्षणच दर्शवतात. पश्चिमी देशांसाठी सोनं हे फक्त व्यवहाराचे साधन असेल, पण भारतीयांसाठी ते समृद्धीचे प्रतीक आहे. अधिकृत आकडेवारीत भारत पहिल्या पाचात नसला, तरी एकूण सुवर्ण संपत्तीच्या बाबतीत जगातील कोणत्याही महासत्तेला मागे टाकण्याची ताकद भारतीय घरांनी आजही राखली आहे. यामुळेच भारताची 'सोन्याची चिमणी' ही ओळख आजही कायम असल्याचे जाणवते.

हेही वाचा – Children Education Allowance: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार दरमहा 11250 रुपये, वाचा, 'बाल शिक्षण भत्त्या'चे नवे नियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number