Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

धमकीचा मेसेज प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी संबंधित ठिकाणांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली.<br/>

Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Bomb Threat: गुजरात राज्यातील अत्यंत पवित्र मानले जाणारे सोमनाथ मंदिर आणि अहमदाबाद येथील खानपूर भागातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी मिळाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. अज्ञात अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे ही गंभीर धमकी पाठवण्यात आली होती. धमकीचा मेसेज प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी संबंधित ठिकाणांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली.

पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने तपासणी

या धमकीच्या ईमेलची तातडीने दखल घेत पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकासह सोमनाथ मंदिर परिसर आणि अहमदाबाद येथील भाजप कार्यालयाची कसून तपासणी केली. स्थानिक पोलिसांनी सर्व संवेदनशील परिसर पिंजून काढला. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या सखोल तपासाअंती दोन्ही ठिकाणी कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.

हेही वाचा – Pune Crime News : कौटुंबिक वाद शिगेला; पत्नीसोबत भयानक कृत्य केल्यानंतर पतीने उचललं टोकाचं पाऊल

ईमेल निव्वळ अफवा; पोलिसांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणावर गांधीनगर पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल निव्वळ एक अफवा होती. तपासात कोणतीही धोक्याची अथवा संशयास्पद बाब समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हा फेक ईमेल कोणी आणि कोठून पाठवला होता, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस पथक अधिक तपास करत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number