Social Media Challenge: सोशल मीडियावरील ‘या’ जीवघेण्या चॅलेंजने घेतला 9 वर्षांच्या चिमुकलीचा बळी; तुमची मूलही हा ट्रेंड पाहातायत का?

या घटनेमुळे जगभरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे किती अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.<br/>

Social Media Challenge: सोशल मीडियावरील ‘या’ जीवघेण्या चॅलेंजने घेतला 9 वर्षांच्या चिमुकलीचा बळी; तुमची मूलही हा ट्रेंड पाहातायत का?

Social Media Challenge: सोशल मीडियावर व्हायरल होणारी आव्हाने (Challenges) केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती जीवावर बेतू शकतात, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टेक्सासमध्ये एका 9 वर्षांच्या चिमुकलीचा 'ब्लॅकआउट चॅलेंज' पूर्ण करण्याच्या नादात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जगभरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे किती अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

काय आहे हे 'ब्लॅकआउट चॅलेंज'?
जॅकलीन ब्लॅकवेल असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तिने सोशल मीडियावर 'ब्लॅकआउट' (Blackout) किंवा 'चोकिंग चॅलेंज' (Choking Challenge) नावाचा एक व्हिडिओ पाहिला होता. या खेळात बेशुद्ध पडेपर्यंत स्वतःचा श्वास रोखून धरण्याचे आव्हान दिले जाते. जॅकलीनने हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, जो तिच्या जीवावर बेतला. विशेष म्हणजे, तिने हा व्हिडिओ आपल्या आजीलाही दाखवला होता आणि आजीने तिला असे न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र कुतूहलापोटी तिने हे पाऊल उचलले.

वडिलांनी अनुभवला आयुष्यातील सर्वात भयानक क्षण
घटनेच्या दिवशी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी जॅकलीन बाहेर खेळायला गेली होती. घरात अचानक शांतता पसरल्याने वडिलांना संशय आला. जेव्हा ते तिला पाहण्यासाठी बाहेर गेले, तेव्हा जॅकलीन त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळली. वडिलांनी तिला दोरीच्या फासातून मुक्त करून तातडीने 'CPR' देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या शोकांतिकेने संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

हेही वाचा –Betting Apps Blocked: केंद्र सरकारची मोठं पाऊल! 300 जुगार आणि सट्टेबाजीची संकेतस्थळे एकाच वेळी ब्लॉक, आतापर्यंत 8400 ॲप्सवर कारवाई

आजच्या काळात मुलांना तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर ठेवणे कठीण असले तरी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.

मोकळा संवाद: मुलांना अशा चॅलेंजेसच्या धोक्याबद्दल विश्वासात घेऊन माहिती द्या. त्यांना घाबरवण्याऐवजी संवाद साधा.
वर्तनावर लक्ष: जर मुले मोबाईलचा अतिवापर करत असतील किंवा त्यांच्या वागण्यात अचानक बदल जाणवला, तर तात्काळ लक्ष द्या.
कंटेंट फिल्टरिंग: मुले इंटरनेटवर नेमके काय पाहत आहेत, यावर पालकांनी देखरेख ठेवणे (Parental Monitoring) आता काळाची गरज बनली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. मुलांच्या खाजगीपणाचा (Privacy) आदर जरूर राखा, पण त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नका. थोडीशी सतर्कता एका निरागस जीवाचा जीव वाचवू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number