World Most Expensive Book: पाटणा पुस्तक मेळावा यंदा एका अनोख्या कारणाने चर्चेत आला आहे. मेळाव्यात ठेवलेल्या एका पुस्तकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण या पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे. हे पुस्तक आणि त्याभोवती निर्माण झालेली चर्चा वादांनाही तोंड देत आहे. त्याचबरोबर, जगातील सर्वात महागडे पुस्तक कोणते याबद्दलही पुस्तकप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
15 कोटींचे पुस्तक
मेळाव्यात प्रदर्शित झालेले हे महागडे पुस्तक लेखक रत्नेश्वर यांनी लिहिले असून त्याचे शीर्षक ‘मैं’ असं आहे. लेखकाचा दावा आहे की, 408 पानांचे हे पुस्तक त्यांनी फक्त 3 तास 24 मिनिटांत लिहिले. लेखनादरम्यान त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली आणि ते ब्रह्मलोकात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यांच्या आधारावर त्यांनी पुस्तकाची किंमत 150 दशलक्ष रुपये (15 कोटी) ठेवली आहे. मात्र अनेकजण याला प्रसिद्धीसाठी केला गेलेला स्टंट असेही म्हणत आहेत.
हेही वाचा – R. Harshita: नृत्यांगणा हर्षिताचा अनोखा पराक्रम; भरतनाट्यम 8 मिनिटांत चढल्या 574 पायऱ्या
जगातील सर्वात महागडे पुस्तक कोणते?
15 कोटी रुपये ऐकूनही तुम्हाला ते अतिशय महाग वाटेल, पण हे पुस्तक जगातील सर्वाधिक किंमतीचा विक्रम नाही. कारण, लिओनार्डो दा विंचीच्या "द कोडेक्स ऑफ लीसेस्टर" या पुस्तकाने हा विक्रम पटकावला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले बिल गेट्स यांनी 1994 मध्ये 30.8 दशलक्ष डॉलर्सना हे पुस्तक खरेदी केले होते. याचा अर्थ पुस्तकाची सध्याची किंमत 270 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे पुस्तक एक अद्वितीय विज्ञान जर्नल आहे, ज्यात दा विंची यांनी चंद्र, जीवाश्म आणि निसर्गाविषयी सखोल निरीक्षणे नोंदवली आहेत.
हेही वाचा – Viral Video: टेकऑफच्या आधीच इंडिगो विमानात कबुतराच्या घिरट्या, व्हिडीओ व्हायरल
जगात अब्जावधींच्या किमतीची पुस्तके
दरम्यान, जगभरात दुर्मिळ हस्तलिखिते, ऐतिहासिक दस्तऐवज आणि अनमोल ग्रंथ लिलावात कोट्यवधी रुपयांना विकले जातात. पण दा विंची यांचे 'द कोडेक्स ऑफ लीसेस्टर' आजही सर्वात महागड्या पुस्तकाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.