CBI Gold Bribery Case : ‘ते 70 लाख सोन्यात बदला…’; फोन टॅप झाला अन् लेडी ऑफिसरला CBI ने गाठलं

एका फोन कॉलच्या रेकॉर्डिंगने या महिला अधिकाऱ्याचा संपूर्ण काळा कारनामा उघड केला असून, या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.<br/>

CBI Gold Bribery Case : ‘ते 70 लाख सोन्यात बदला…’; फोन टॅप झाला अन् लेडी ऑफिसरला CBI ने गाठलं

CBI Gold Bribery Case : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा देत 2026 या वर्षाची सुरुवात सीबीआयने (CBI) एका धडक कारवाईने केली आहे. झांसी रेंजमधील सीजीएसटी (CGST) च्या डेप्युटी कमिश्नर आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना 1.5 कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका फोन कॉलच्या रेकॉर्डिंगने या महिला अधिकाऱ्याचा संपूर्ण काळा कारनामा उघड केला असून, या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

'त्या' एका फोन कॉलने खेळ संपवला

सीबीआय या सिंडिकेटवर गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेवून होती. एका फर्म मालकाचे करचुकवेगिरीचे प्रकरण मिटवण्यासाठी दीड कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 70 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना 'मॅडम'चा एक आदेश त्यांना नडला. फोनवर लाचेची रक्कम मिळाल्याचे समजताच प्रभा भंडारी यांनी आदेश दिला, 'ठीक आहे, ते पैसे लगेच सोन्यात बदलून मला आणून द्या.' रोख रकमेपेक्षा सोने लपवणे सोपे जाईल, असा त्यांचा बनाव होता. मात्र सीबीआयने हा संवाद रेकॉर्ड केला आणि सापळा रचून सर्वांना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा – Beed Crime : बीड हादरलं! ऊसतोड मजुराच्या दोन चिमुकलींवर अत्याचार

झांसी ते दिल्ली एकाच वेळी छापेमारी

अटकेनंतर सीबीआयने झांसी, दिल्ली आणि ग्वाल्हेर येथील निवासांवर एकाच वेळी छापे टाकले. या शोधमोहिमेत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सीबीआयने सुमारे 9 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. यात मोठी रोकड, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि अनेक संशयास्पद डायऱ्या आढळल्या. तथापी, प्रभा भंडारी यांचे कार्यालय आणि निवासस्थान तपासासाठी सील करण्यात आले आहे.

हेही वाचा – Honey Trap : एका पार्सलने केला घात!; 16 सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

साथीदारही गजाआड

या भ्रष्टाचाराच्या रॅकेटमध्ये प्रभा भंडारी या मुख्य सूत्रधार असल्या, तरी त्यांच्या मदतीला एक पूर्ण साखळी कार्यरत होती. सीबीआयने या प्रकरणात दोन सुपरिटेंडंट (जे वसुलीचे काम करायचे), एक फर्म मालक (ज्याने लाच दिली) आणि एक वकीलाला (जो व्यवहारात मध्यस्थ होता) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. दरम्यान, वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे 2026 मध्ये सीबीआय अधिक आक्रमक भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारचा 'झिरो टॉलरन्स' संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला असून, जीएसटी विभागातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सीबीआय आता या लाचेचे धागेदोरे आणखी वरपर्यंत पोहोचले आहेत का, याचा तपास करत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number