ICC T20 World Cup: मोठी घोषणा! 42 वर्षीय ‘या’ खेळाडूवर टी-20 विश्वचषकाच्या कर्णधार पदाची धुरा

आगामी विश्वचषकात इटलीच्या संघाची धुरा अनुभवी खेळाडू वेन मॅडसेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, वेन मॅडसेन पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात इटलीचे नेतृत्व करणार आहेत.

ICC T20 World Cup: मोठी घोषणा! 42 वर्षीय ‘या’ खेळाडूवर टी-20 विश्वचषकाच्या कर्णधार पदाची धुरा

ICC T20 World Cup: इटालियन क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण जवळ आला असून 2026 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात इटली प्रथमच सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर इटालियन क्रिकेट फेडरेशनने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आगामी विश्वचषकात इटलीच्या संघाची धुरा अनुभवी खेळाडू वेन मॅडसेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, वेन मॅडसेन पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात इटलीचे नेतृत्व करणार आहेत. विशेष बाब म्हणजे 41 वर्षीय मॅडसेनने आतापर्यंत इटलीकडून केवळ 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2 जानेवारीला ते 42 वर्षांचे होतील. तरीही त्यांच्या अनुभवावर विश्वास दाखवत त्यांना कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, 16 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात फेडरेशनने स्पष्ट केले की, नोव्हेंबरच्या अखेरीस कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेले मॅडसेन आगामी सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व करतील. जानेवारी महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या द्विपक्षीय मालिकेत तसेच 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही ते कर्णधार असतील. ही स्पर्धा कोणत्याही स्तरावर इटलीची पहिलीच जागतिक क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे.

हेही वाचा – IPL Inspiring Story: आई फुले विकायची, वडील मैदान सांभाळायचे; आज मुलगा आयपीएलचा स्टार

माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्स यांना टी-20 विश्वचषकासाठी इटलीच्या संघातून वगळण्यात आले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. फेडरेशनने सांगितले की, बर्न्सच्या उपलब्धतेबाबत काही प्राथमिक चर्चा झाल्या होत्या, मात्र कोणताही औपचारिक करार झाला नव्हता. तांत्रिक आणि संघटनात्मक आढाव्यानंतर स्थिरता आणि सातत्याला प्राधान्य देत मॅडसेनलाच कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. फेडरेशनच्या मते, वेन मॅडसेन यांच्याकडे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. ते संघाच्या नेतृत्व गटातील महत्त्वाचा घटक असून, संघाला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ऐतिहासिक स्पर्धेपूर्वी संघात एकता आणि स्थैर्य राखणे हेच सध्या सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे फेडरेशनने नमूद केले.

हेही वाचा – IPL 2026 Auction Highlights: पृथ्वी शॉ-सर्फराज खानला एकसारखी बोली, कोणत्या संघांनी विकत घेतलं?

तसेच, फेडरेशनने जो बर्न्स यांच्या योगदानाचीही प्रशंसा केली आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषक पात्रता फेऱ्यांमध्ये त्यांनी इटलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रादेशिक पात्रता फेरीत त्यांनी संघाचे नेतृत्व करत इटलीला थेट विश्वचषकात प्रवेश मिळवून दिला. याशिवाय, 50 षटकांच्या चॅलेंज लीग स्पर्धेतही त्यांनी इटलीचे प्रतिनिधित्व केले होते, जी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मार्गातील महत्त्वाची स्पर्धा आहे. दरम्यान, इटली 9 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध आपल्या टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. ग्रुप ‘सी’ मध्ये इटलीला इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि नेपाळ या संघांचा सामना करावा लागणार आहे. इटालियन क्रिकेटसाठी हा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number