Stock Market Closing Bell: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; सेन्सेक्स ‘इतक्या’ अंकानी घसरला

आजच्या सत्रात बाजारावर विक्रीचा दबाव इतका होता की, सेन्सेक्समधील 30 पैकी तब्बल 24 कंपन्यांचे समभाग लाल रंगात (तोट्यात) बंद झाले.

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; सेन्सेक्स ‘इतक्या’ अंकानी घसरला

Stock Market Closing Bell: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचे सावट भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गुरुवारी स्थानिक बाजारात सलग 2 दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बीएसई (BSE) सेन्सेक्स 829.29 अंकांनी (1.08 टक्के) घसरून 76,034.42 वर स्थिरावला. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE) निफ्टीमध्येही 227.70 अंकांची (0.95 टक्के) घसरण झाली असून तो 23,639.15 वर बंद झाला. विशेष म्हणजे, आज बाजाराची सुरुवातच घसरणीसह झाली होती.

सेन्सेक्समधील 24 कंपन्यांना तोटा; अक्षय ऊर्जा क्षेत्रात मात्र तेजी
आजच्या सत्रात बाजारावर विक्रीचा दबाव इतका होता की, सेन्सेक्समधील 30 पैकी तब्बल 24 कंपन्यांचे समभाग लाल रंगात (तोट्यात) बंद झाले. निफ्टी 50 निर्देशांकातही 40 समभाग नुकसानीसह बंद झाले. मात्र, या पडझडीतही अक्षय ऊर्जा (Renewable Energy) कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. एनटीपीसी (NTPC) हा 2.79 टक्के वाढीसह सेन्सेक्समध्ये टॉप गेनर ठरला. पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांसारख्या मोजक्या कंपन्यांनी हिरव्या रंगात बंद होत गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा दिला.

हेही वाचा – Rupee Vs Dollar: भारतीय रुपयाला जागतिक युद्धाचा फटका; किती झाली घसरण? तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड
आजच्या घसरणीत ऑटोमोबाईल आणि बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसला. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक 4.23 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल मारुती सुझुकी (3.60 टक्के), बजाज फायनान्स (3.31 टक्के) आणि एल अँड टी (3.06 टक्के) यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. बँकिंग क्षेत्रात आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांसारखे दिग्गज समभाग 2 टक्क्यांहून अधिक घसरले. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही किरकोळ घसरण पाहायला मिळाली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number