Sreesanth Challenge to Harbhajan: ‘हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये ये…’; 19 वर्षानंतरही जखम भळभळती, श्रीसंतचे हरभजन सिंगला खुले आव्हान

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने माजी फिरकीपटू हरभजन सिंगवर गंभीर आरोप करत त्याला थेट बॉक्सिंग रिंगमध्ये भिडण्याचे उघड आव्हान दिले आहे.

Sreesanth Challenge to Harbhajan: ‘हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये ये…’; 19 वर्षानंतरही जखम भळभळती, श्रीसंतचे हरभजन सिंगला खुले आव्हान

Sreesanth Challenge to Harbhajan: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील सर्वात वादग्रस्त ठरलेले 'स्लॅपगेट' प्रकरण तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने माजी फिरकीपटू हरभजन सिंगवर गंभीर आरोप करत त्याला थेट बॉक्सिंग रिंगमध्ये भिडण्याचे उघड आव्हान दिले आहे. 2008 मधील त्या कुप्रसिद्ध थप्पड मारण्याच्या घटनेचा व्यावसायिक जाहिरातींसाठी गैरवापर होत असल्याचा दावा करत श्रीसंतने आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

"तो प्रसंग पुन्हा घडवण्याची हिंमत आहे का?" – श्रीसंतचा हरभजनला संतप्त सवाल
एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, श्रीसंतने हरभजन सिंगवर त्या जुन्या वादाचा वारंवार व्यावसायिक फायदा उठवल्याचा आरोप केला. एका जुन्या जाहिरातीच्या पोस्टरचा संदर्भ देत, ज्यामध्ये दोघेही बॉक्सिंगचे हातमोजे घालून दिसत होते, श्रीसंत म्हणाला, "त्याच्यात माझ्यासोबत रिंगमध्ये उतरण्याचे धाडस आहे का? प्रत्यक्ष मैदानात येण्याची त्याची तयारी आहे का? भज्जी, मी तुला विचारत आहे की माझ्याशी रिंगमध्ये भिडण्याची धमक तुझ्याकडे आहे का? हे काही नाटक नाही. जर तुला त्या घटनेबद्दल आणि माझ्याबद्दल खरंच काही अडचण असेल, तर जाहिरातींच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने रिंगमध्ये ये, मी तुझी वाट पाहत आहे."

हेही वाचा – ICC Women's T20 World Cup 2026: महिला टी20 विश्वचषकात मोठा बदल; दुखापतग्रस्त श्रेयंकाच्या जागी 'या' खेळाडूला संधी

श्रीसंतने पुढे बोलताना हरभजनला व्यावसायिक दृष्ट्याही आव्हान दिले. तो म्हणाला की, मी सध्या 'बेअर नकल फाईट लीग'शी (Bare Knuckle Fight League) जोडला गेलो आहे. जर तू त्या घटनेचा वापर करून इतके पैसे कमवत असशील, तर मलाही कमवू दे. आपल्यात थोडासाही स्वाभिमान शिल्लक असेल, तर केवळ जाहिराती करण्यापेक्षा प्रत्यक्ष रिंगमध्ये उतरायला हवे, असे म्हणत त्याने हरभजनला मनापासून आमंत्रित केले आहे.

काय आहे 'स्लॅपगेट' प्रकरणाची पार्श्वभूमी?
आयपीएलच्या 2008 मधील अगदी पहिल्या हंगामात हा धक्कादायक प्रकार घडला होता. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरभजन सिंगने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना संपल्यानंतर मैदानातच श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर श्रीसंत मैदानातच रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो देशभरात प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यानंतर हरभजनवर मोठी टीका झाली होती. नुकतेच आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number