Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडिया (Bank of India) ने अधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे बँकेत एकूण 115 अधिकारी पदे भरली जाणार आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत यांच्या आधारे केली जाईल. अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन प्रक्रिया ठरवली जाईल.
हेही वाचा – Job Opportunity: केवळ मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा; या क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप:
एकूण गुण: 125
इंग्रजी भाषा – 25 गुण (फक्त पात्रता स्वरूपात, गुणवत्ता यादीत समावेश नाही)
व्यावसायिक ज्ञान – 100 गुण
परीक्षा कालावधी – 100 मिनिटे
पात्रता गुण:
सामान्य/EWS उमेदवारांसाठी – किमान 35 टक्के गुण आवश्यक. इंग्रजी भाषा, व्यावसायिक ज्ञान आणि सामान्य जागरूकता या तिन्ही विषयांमध्ये किमान गुण मिळणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी करा.
नोंदणीनंतर ऑनलाइन अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क जमा करून अर्ज सबमिट करा.
भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट काढा.
हेही वाचा – SAIL MT Recruitment 2025: इंजिनिअर पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी; SAIL मध्ये 124 नवी पदे जाहीर
अर्ज शुल्क
SC/ST/अपंग उमेदवार: 175
सामान्य व इतर श्रेणी: 850
परीक्षा शुल्क फक्त मास्टर/व्हिसा/रुपे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट, क्यूआर किंवा यूपीआय वापरून भरता येतील. अधिक माहितीसाठी उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.