Honey Trap : एका पार्सलने केला घात!; 16 सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

गुजरात एटीएसने (ATS) सादर केलेले पुरावे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.<br/>

Honey Trap : एका पार्सलने केला घात!; 16 सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

Pakistani Spy Case : भारतीय लष्करातील जवानांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या रश्मनी पाल या संशयित महिला गुप्तहेराला नाडियाड सत्र न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. गुजरात एटीएसने (ATS) सादर केलेले पुरावे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

बनावट ओळखीचा वापर आणि 16 सैनिकांशी संपर्क

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रश्मनी पाल हिने 'प्रिया ठाकूर' यांसारख्या विविध बनावट नावांनी सोशल मीडियावर प्रोफाईल्स तयार केली होती. या माध्यमातून तिने भारतीय लष्करातील किमान 16 सैनिकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. जवानांशी जवळीक साधून त्यांच्या तैनातीची ठिकाणे, लष्करी हालचाली आणि दैनंदिन कामकाजाची गोपनीय माहिती मिळवण्याचा तिचा प्रयत्न होता, असा आरोप एटीएसने केला आहे.

हेही वाचा – Rats ate Seized Ganja : 'कधी ऐकलंय का.. उंदरांनी खाल्ला 200 किलो गांजा?'; न्यायालयात पोलिसांचं अजब स्पष्टीकरण, मग..

पाकिस्तानातून आलेल्या 'त्या' पार्सलने उघडले गुपित

या प्रकरणाचा उलगडा एका संशयास्पद पार्सलमुळे झाला. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात पाकिस्तानातून एक पार्सल आले होते. या ग्रामीण भागातील कोणाचाही पाकिस्तानशी संबंध नसल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. या पार्सलचा माग काढत असताना तपास यंत्रणा रश्मनी पालपर्यंत पोहोचल्या आणि पाकिस्तानी हँडलर्सनी विणलेले हे जाळे उघडकीस आले.

हेही वाचा – Sanjay Raut Threat : संजय राऊतांच्या घराबाहेर उभ्या कारवर 'बॉम्ब'ची धमकी; धुळीने माखलेल्या काचेवर लिहिला धोकादायक संदेश

तपासात समोर आल्या धक्कादायक बाबी 

दरम्यान, स्वतःचा ठावठिकाणा लपवण्यासाठी रश्मनी शेजाऱ्यांच्या मोबाईलचा वापर करून 'ओटीपी' (OTP) मिळवत असे. तसेच, तांत्रिक तपासात सापडू नये म्हणून ती इतरांच्या इंटरनेट कनेक्शनवरून व्हिडिओ आणि मजकूर अपलोड करत होती. व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर मेसेजिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून ती सतत पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात सिद्ध झाले आहे. या कटात रश्मनीला मदत करणारे काही स्थानिक लोक अजूनही फरार असून, गुजरात एटीएस त्यांचे शोध घेत आहे. लष्करी माहिती चोरून देशाच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या रश्मनी पाल आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचे गंभीर कलम लावण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number