Professor Proposed In Live Class: कर्नाटकातील तुमकूर येथील ‘श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेज’मध्ये (SSMC) एका सहाय्यक प्राध्यापकाने भर वर्गात विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला महाविद्यालयाच्या आवारातच बेदम मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकाला तातडीने निलंबित केले आहे.
‘आय लव्ह यू’ म्हणत वाटली चॉकलेट्स
व्हायरल व्हिडिओमध्ये ‘अब्दुल’ अशी ओळख असलेला हा प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना दिसतो. तो म्हणतो, “या बॅचचे प्रेम मी नाकारू शकलो नाही, म्हणूनच तुमच्यातील एका विद्यार्थिनीला मला लग्नाची मागणी घालायची आहे.” इतकेच बोलून न थांबता त्याने त्या विद्यार्थिनीला “I Love You” म्हटले आणि संपूर्ण वर्गाला चॉकलेट्स वाटण्यास सुरुवात केली. प्राध्यापकाच्या या अर्वाच्य वर्तनामुळे वर्गात एकच खळबळ उडाली.
विद्यार्थिनीचा कडवा प्रतिकार
प्राध्यापक व्यासपीठावरून खाली उतरताच त्या विद्यार्थिनीने त्याला गाठले आणि जाब विचारला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीत प्राध्यापकाने उलट दावा केला की, “तूच माझ्यावर आधी प्रेम व्यक्त केले होतेस आणि त्याचे CCTV फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे.” जेव्हा विद्यार्थिनीने त्याला पुरावा दाखवण्यास सांगितले, तेव्हा त्याने “मी तुझ्याशी उद्या बोलेन,” असे म्हणून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
Absolute bizarre! A 50-year-old professor, Abdul Mohammad, at the Sri Siddhartha Institute of Medical Sciences, Bengaluru, proposed to a 19-year-old student during a live class. When she confronted him, he claimed that she had proposed to him first, which she clearly denies.… pic.twitter.com/hMUlBYKqh7 — THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) March 26, 2026
महाविद्यालय आवारात पाठलाग करून मारहाण
ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाविद्यालयात पसरली आणि इतर विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला घेराव घालून जाब विचारला, ज्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. एका व्हिडिओमध्ये ती विद्यार्थिनी प्राध्यापकाला आपल्या पादत्राणाने मारताना दिसत आहे, तर इतर विद्यार्थी त्याचा गाडीपर्यंत पाठलाग करून त्याला मारहाण करत आहेत. या हल्ल्यातून हा प्राध्यापक कसाबसा स्वतःचा जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
He got the required belt treatment afterwards?? pic.twitter.com/S021QNbxEh — Unfiltered Truths (@IndicThought_) March 26, 2026
प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई
हे महाविद्यालय कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मालकीचे असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने संबंधित सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित केले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारच्या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.