Rats ate Ganja Seized by Police : झारखंडमधील रांची येथील एका विशेष NDPS (Narcotics Drugs and Psychotropic Substances) न्यायालयाने अंमली पदार्थांच्या तस्करीतील एका आरोपीला नुकतेच निर्दोष मुक्त केले आहे. या निकालामागील सर्वात विचित्र कारण म्हणजे, पोलिसांनी जप्त केलेला मुख्य पुरावा म्हणजेच 200 kg गांजा (Ganja) न्यायालयात सादर करण्यात पोलीस अपयशी ठरले. शिवाय, त्यांनी अगदी अजब स्पष्टीकरण दिले.. ते ऐकल्यानंतर भल्याभल्यांची झोप उडेल!
पोलिसांचा अजब दावा
जेव्हा न्यायालयाने जप्त केलेल्या मालाबाबत विचारणा केली, तेव्हा पोलिसांनी असा अजब दावा केला की, गोदामात (Warehouse) साठवून ठेवलेला हा सर्व गांजा उंदरांनी खाऊन टाकला आहे. पोलिसांचा हा युक्तिवाद ऐकून केवळ न्यायालयच नाही तर उपस्थित सर्वच थक्क झाले. या प्रकरणाचा खटला सुनावणीसाठी आला, तेव्हा तपासातील अनेक त्रुटी समोर आल्या. अखेर मुख्य पुरावाच न सापडल्यामुळे न्यायालयाला नाईलाजास्तव आरोपींची मुक्तता करणे भाग पडले.
तपासात त्रुटी
हे संपूर्ण प्रकरण January 17, 2022 रोजी सुरू झाले होते. रांची जिल्ह्यातील ओरमांझी पोलिसांनी NH-20 वर एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो (Bolero) गाडीवर मोठी कारवाई केली होती. या गाडीच्या झडतीदरम्यान, पोलिसांनी 170 पाकिटांमध्ये बंद असलेला सुमारे 200 kg गांजा जप्त केल्याचा दावा केला होता. त्यावेळेस गाडीतून उडी मारून पळून जाणाऱ्या तिघांपैकी इंद्रजित नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते, तर इतर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
रंगेहात पकडले पण सिद्ध करण्यात कमी पडले
2024 मध्ये जेव्हा या प्रकरणाचा खटला सुनावणीसाठी आला, तेव्हा तपासातील अनेक त्रुटी समोर आल्या. पोलिसांनी गांजा उंदरांनी खाल्ल्याचे सांगितल्याने खटल्याचा मुख्य तांत्रिक आधारच नाहीसा झाला. Jansatta ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे (Lack of Evidence) आरोपीची निर्दोष मुक्तता केली. जप्त केलेला अंमली पदार्थ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना तो उंदरांनी संपवल्याचा दावा करणे, हे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे.