Crime News: लिव्ह-इन संबंधाला पालकांचा विरोध; समजूत काढायला गेलेल्या आई- वडिलांसह मुलीने प्रियकराच्या मदतीने बहिणीलाही संपवलं

तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आई-वडील आणि स्वतःच्या सख्ख्या धाकट्या बहिणीला संपवलं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती.

Crime News: लिव्ह-इन संबंधाला पालकांचा विरोध; समजूत काढायला गेलेल्या आई- वडिलांसह मुलीने प्रियकराच्या मदतीने बहिणीलाही संपवलं

Crime News: बंगळुरूच्या के.आर. पुरम (K.R. Puram) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आई-वडील आणि स्वतःच्या सख्ख्या धाकट्या बहिणीला संपवलं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती. मात्र, तिच्या कुटुंबाचा या प्रेमसंबंधांना आणि एकत्र राहण्याला तीव्र विरोध होता. याच कारणावरून मुलगी आणि पालकांमध्ये सातत्याने खटके उडत होते. सोमवारी संध्याकाळी पालक मुलीची समजूत काढण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेले असता, तिथेच त्यांचा घात करण्यात आला. या तिहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, दुसऱ्या आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

प्रियकराच्या फ्लॅटवर झाला वाद
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमसुंदर हे त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी आणि धाकटी मुलगी सुप्रिया यांच्यासह सीगेहल्ली (Seegehalli) भागातील एका अपार्टमेंटमध्ये गेले होते. तिथे त्यांची मोठी मुलगी श्वेता तिचा प्रियकर केनेथसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. श्वेताच्या या निर्णयामुळे कुटुंब प्रचंड नाराज होते. काल संध्याकाळी जेव्हा सर्वजण एकत्र आले, तेव्हा या नात्यावरून पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, श्वेता आणि तिचा प्रियकर केनेथ यांनी मिळून घरातच तिघांवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सोमसुंदर (वय 52), त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी (वय 48) आणि त्यांची लहान मुलगी सुप्रिया (वय 19) या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Delhi Crime News : कॅब चालकानं डाव साधला! फुगे विकणाऱ्या 10 वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवरून उचललं; अत्याचारांनंतर तिला संपवून जंगलात फेकून दिलं

चाकूने वार करून तिघांचाही घेतला बळी
घटनेची माहिती मिळताच के.आर. पुरम पोलीस ठाण्याचे पथक तातडीने सीगेहल्ली येथील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी 'ईस्ट पॉइंट हॉस्पिटल'मध्ये रवाना केले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी तरुणी गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या प्रियकरासोबत या अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी रात्री त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि दोघांनी मिळून तिघांना संपवलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरार आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number