Tamil Nadu Election Result 2026: अफवेचा धसका! ‘थलपती विजय हरणार..’; निकालापूर्वीच थलपतीच्या चाहत्याने उचललं टोकाचं पाऊल

आपला आवडता सुपरस्टार आणि राजकारणी 'थलपती' विजय यांचा पक्ष पराभूत होणार, या अफवेवर विश्वास ठेवून त्यांच्या एका कट्टर चाहत्याने चक्क स्वतःचा गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

Tamil Nadu Election Result 2026: अफवेचा धसका! ‘थलपती विजय हरणार..’; निकालापूर्वीच थलपतीच्या चाहत्याने उचललं टोकाचं पाऊल

Tamil Nadu Election Result 2026:  तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपला आवडता सुपरस्टार आणि राजकारणी 'थलपती' विजय यांचा पक्ष पराभूत होणार, या अफवेवर विश्वास ठेवून त्यांच्या एका कट्टर चाहत्याने चक्क स्वतःचा गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, वेळीच मदत मिळाल्याने या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी तामिळनाडूसह 4 राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. याच दरम्यान सोशल मीडियावर 'विजय यांचा टीव्हीके (TVK) पक्ष पिछाडीवर असून त्यांचा पराभव होणार आहे', अशा अफवा वेगाने पसरल्या. कृष्णगिरी येथील रहिवासी असलेल्या महेंद्रन (वय 28) या तरुणाने या अफवांना सत्य मानले. आपल्या लाडक्या नेत्याचा पराभव सहन न झाल्याने त्याने घराबाहेरच स्वतःवर वार करून घेतले. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून महेंद्रनला तत्काळ रोखले आणि त्याला गंभीर अवस्थेत कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्यात नसल्याचे समजते.

'TVK'ची सत्तेकडे वाटचाल
ज्या पराभवाच्या भीतीने चाहत्याने हे टोकाचे पाऊल उचलले, तो केवळ एक गैरसमज ठरला आहे. सध्याच्या अधिकृत कलानुसार, विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.

सध्याची आकडेवारी:

TVK आघाडी: 112 जागा (बहुमताच्या जवळ)
अण्णाद्रमुक आघाडी: 75 जागा
द्रमुक आघाडी: 50 जागा

हेही वाचा – Navneet Rana : 'ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला', बंगालच्या निकालावर नवनीत राणांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या 'सनातनींचा विरोध करणाऱ्यांना…'

सत्तांतराचे संकेत; विजय होऊ शकतात 'मुख्यमंत्री'
तामिळनाडूच्या 234 जागांपैकी 112 जागांवर आघाडी घेत विजय यांनी प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे. चित्रपटसृष्टीतील 36 वर्षांच्या करिअरनंतर राजकारणात उतरलेल्या विजय यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. या कलानुसार तामिळनाडूमध्ये मोठे सत्तांतर होणार असून, 'थलपती' विजय हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number