Delhi Blast Case: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नववी अटक; NIA ने आवळल्या आत्मघातकी हल्ल्याची शपथ घेतलेल्या यासिर दारच्या मुसक्या

यासिर अहमद दार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहे.

Delhi Blast Case: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नववी अटक; NIA ने आवळल्या आत्मघातकी हल्ल्याची शपथ घेतलेल्या यासिर दारच्या मुसक्या

Delhi Blast Case: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील नवव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यासिर अहमद दार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, यासिर दारला दिल्लीमधून अटक करण्यात आली असून, त्याच्यावर यूएपीए 1967 आणि भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासात यासिर संपूर्ण दहशतवादी कटात सक्रियपणे सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

आत्मघातकी हल्ल्याची शपथ घेतल्याचा खुलासा

एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, यासिरने केवळ दहशतवादी कटाचा भाग होण्याचीच नव्हे, तर आत्मघातकी हल्ला करण्याचीही शपथ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तो ‘उमर’प्रमाणे आत्मत्यागी कारवाई करण्यासाठी तयार होता.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! घरात घुसून माजी सरपंचाला संपवलं, मुलंही गंभीर जखमी

मुख्य आरोपींसोबत सतत संपर्क

तपासात असेही समोर आले आहे की, यासिर या प्रकरणातील मुख्य आरोपी उमर-उन-नबीसह इतर दहशतवाद्यांच्या सतत संपर्कात होता. उमर-उन-नबी हा स्फोटात ठार झाला होता. यासिरचा आणखी एक आरोपी मुफ्ती इरफान याच्याशीही नियमित संवाद सुरू असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत.

डिजिटल पुरावे जप्त, शोधमोहीम तीव्र

या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएने इतर केंद्रीय व राज्य यंत्रणांसह समन्वय साधत जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि दहशतवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. डिजिटल संकेतांच्या आधारे तपास पुढे नेत एनआयएने यासिर दारपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. यापूर्वी फरीदाबाद येथील अल-फला विद्यापीठ परिसरातही शोधमोहीम राबवण्यात आली होती. या ठिकाणी मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनी आणि डॉ. शाहीन सईद यांच्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे सापडले होते.

हेही वाचा – Kolkata Cyber Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार; निवृत्त ONGC कर्मचाऱ्याची 99 लाखांची फसवणूक

स्फोटात 11 जणांचा मृत्यू

दरम्यान, 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या भीषण कार बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. राजधानीतील अतिसंवेदनशील परिसरात झालेल्या या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली होती. एनआयएने स्पष्ट केले आहे की, या दहशतवादी नेटवर्कमधील प्रत्येक सदस्याला अटक होईपर्यंत आणि संपूर्ण मॉड्यूल पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत तपास व कारवाई सुरूच राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number