Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयिताला सीबीआयकडून क्लिन चीट; तपासाला नवे वळण

सुरुवातीच्या तपासात प्रमुख संशयित संजीव मुखियाला अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्याला सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे.

Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयिताला सीबीआयकडून क्लिन चीट; तपासाला नवे वळण

Bihar Paper Leak Masterminds CBI Clean Chit : नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नीट यूजी 2024 प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या संजीव कुमार ऊर्फ संजीव मुखिया याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. बिहार पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात नालंदा येथील रहिवासी असलेल्या संजीव मुखियावर संशय व्यक्त करण्यात आला होता. दीर्घकाळ फरार राहिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. मात्र तपासादरम्यान मुखियाचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत असे सीबीआयने स्पष्ट केले. 

सीबीआय तपासातील महत्त्वाचे मुद्दे आणि न्यायालयातील घडामोडी 
सीबीआयने पाटणा येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत:
– सीबीआयने या प्रकरणात एकूण 45 संशयित आरोपींविरोधात विविध दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. 
– दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात संजीव मुखियाच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. 
– बिहारमधील इतर परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सुरुवातीला त्याला एफआयआरमध्ये नाव देण्यात आले होते. 
– नीट यूजी 2024 प्रकरणात ठोस पुरावा न मिळाल्याने त्याला या गुन्ह्यातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 
– जामीन मिळाला असला तरी इतर परीक्षा घोटाळ्यांमधील आरोपी असल्यामुळे त्याला सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे. 

सीबीआयचे अधिकृत स्पष्टीकरण 
केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे की, नीट यूजी 2024 प्रश्नपत्रिका चोरी आणि तिच्या वितरणाचा संपूर्ण कट उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींची आणि त्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. परंतु संजीव मुखियाचा प्रश्नपत्रिका चोरीत किंवा तिच्या वाटपात कोणताही प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणतेही दोषारोपपत्र दाखल केले गेले नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Anti Paper Leak Law: 10 वर्षे तुरुंगवास अन् 10 कोटी दंड… पेपरफुटीच्या माफियांचे धाबे दणाणणार; मोदी सरकार आणणार अत्यंत कठोर कायदा

उत्तराखंडमध्ये इंजिनीअरिंगचे 2 पेपर फुटल्याने खळबळ
देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील घोटाळ्यावरून संतापाचे वातावरण असताना उत्तराखंड राज्यातून पेपर फुटीची आणखी एक नवीन घटना समोर आली आहे. देहराहून येथील उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या (यूटीयू) इंजिनीअरिंग परीक्षेचे 2 पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे आहेत:
– प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने दोन्ही परीक्षा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला.
– शिवालिक कॉलेजचा प्राध्यापक आशिष कुमार याच्यावर प्रश्नपत्रिकेतील मिळतेजुळते प्रश्न कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप आहे.
– याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवून प्राध्यापक आशिष कुमार याला अटक केली आहे. 
– पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास वेगाने सुरू आहे. 

परीक्षा पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह 
एकीकडे नीट परीक्षेतील मुख्य सूत्रधाराला मिळालेली क्लिन चीट आणि दुसरीकडे विविध राज्यांमध्ये सातत्याने समोर येणारे पेपर फुटीचे सत्र यामुळे परीक्षा पद्धतीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिहार आणि उत्तराखंडमधील घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच वाढला आहे. विविध राज्यांमधील स्पर्धा आणि व्यावसायिक परीक्षांमधील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता देशभरातून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – Higher Education Secretary Transfer : शिक्षणमंत्री नाही तर उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांची उचलबांगडी; भाजपकडून 'हीच मोदी गॅरंटी' असा दावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number