Mutton Cooked on Funeral Pyre: संतापजनक! जळत्या चितेवर शिजवले मटण; धक्कादायक प्रकारानंतर एकाला अटक, दोघे फरार

मद्यप्राशन केल्यानंतर मटण खाण्याची तीव्र इच्छा झाल्यामुळे त्या तिघांनी जळत्या चितेचाच यासाठी वापर करण्याचे ठरवले, असे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगितले.

Mutton Cooked on Funeral Pyre: संतापजनक! जळत्या चितेवर शिजवले मटण; धक्कादायक प्रकारानंतर एकाला अटक, दोघे फरार

Mutton Cooked on Funeral Pyre: माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रविवारी वीरपाल नावाचा तरुण जेव्हा स्मशानभूमीत आपल्या वडिलांच्या जळत्या चितेची पाहणी करण्यासाठी गेला, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. तीन व्यक्ती त्याच्या वडिलांच्या जळत्या चितेच्या आगीवर मटण शिजवत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर वीरपालने तात्काळ पोलीस प्रशासनाला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली.  

पोलिसांची घटनास्थळी धाव; दोन आरोपी फरार, एकाला अटक
अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिक्षा भारवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने स्मशानभूमीत धाव घेतली. पोलिसांची गाडी येताना पाहून चितेवर मटण शिजवणारे दोन जण घटनास्थळावरून पसार झाले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सुरेंद्र नावाच्या एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी सुरेंद्रने दिलेल्या जबानीमुळे पोलीसही अवाक झाले. मद्यधुंद अवस्थेत हा भयानक आणि अघोरी प्रकार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.

हेही वाचा – Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

मद्यधुंद अवस्थेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली
पोलीस चौकशीत आरोपी सुरेंद्रने सांगितले की, तो आणि त्याचे दोन मित्र दारूच्या नशेत धुंद होते. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांना मटण खाण्याची तीव्र इच्छा झाली होती. स्मशानभूमीत एकटीच जळत असलेली चिता पाहून आणि आसपास कोणीही नसल्याचे पाहून त्यांनी मटण शिजवण्यासाठी चितेच्या आगीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. अशा मानसिकतेतूनच त्यांनी चितेवर मटण शिजवायला ठेवल्याचे त्याने मान्य केले. उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूर जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडला.

आरोपीची तुरुंगात रवानगी; फरार दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू
पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत अटक केलेल्या सुरेंद्रची न्यायालयीन कोठडीत म्हणजेच तुरुंगात रवानगी केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या फरार दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पवित्र अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घडलेल्या या किळसवाण्या आणि विकृत कृत्यामुळे संपूर्ण शहाजहाँपूर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा – Children Drowned : मन हेलावणारी घटना! धार्मिक पर्वाच्या स्नानासाठी गेलेल्या 6 मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number