Muskan Rastogi: मेरठमध्ये पतीच्या हत्याकांडाने हादरवून टाकणाऱ्या मुस्कान रस्तोगीने सोमवारी एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे, हा दिवस तिच्या पती सौरभ राजपूतचा वाढदिवस असल्याने ही घटना आणखी चर्चेत आली. मुस्कानला सध्या मेडिकल कॉलेजमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. आठ सदस्यांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली तिची प्रसूती झाली.
साध्या प्रसूतीद्वारे मुलीचा जन्म
संध्याकाळी 7 वाजता मुस्कानने सामान्य प्रसूतीद्वारे मुलीला जन्म दिला. एप्रिलमध्ये झालेल्या अल्ट्रासाऊंडमध्ये तिचा गर्भधारणा तपासला गेला होता. सौरभच्या हत्येआधीच ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली होती.
हेही वाचा – Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग
प्रियकरासोबत पतीला संपवलं
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी 3 मार्च 2025 रोजी सौरभला संपवलं. सौरभला संपल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये पुरण्यात आले होते. यानंतर दोघेही मनालीला गेले होते. 11 दिवसांचा ‘हनीमून’ संपल्यानंतर ते मेरठला परतले तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. दोघेही 19 मार्चपासून तुरुंगात आहेत.
मुस्कानने पतीला संपवण्यासाठी स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीची काळजी घेत मोठी योजना आखली. तिने तिला आईवडिलांकडे सोपवले होते. त्यानंतरच प्रियकराच्या मदतीने तिने सौरभला संपवले. ही घटना मेरठच्या ब्रह्मपुरी परिसरातील इंद्रनगरमध्ये घडली. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. सहा वर्षांच्या मुलीचे ते पालक होते. लंडनमध्ये नोकरी करणारा सौरभ मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आला होता, पण त्याच रात्री त्याला संपवण्यात आलं. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात आणि सोशल मीडियावर निळ्या ड्रम्पच्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती.