मुंबईत इमारतीची पडझड, महिलेचा मृत्यू

ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळच्या रुबिनिसा मंझिल या चार मजली इमारतीची पडझड झाली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.

मुंबईत इमारतीची पडझड, महिलेचा मृत्यू

मुंबई : ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळच्या रुबिनिसा मंझिल या चार मजली इमारतीची पडझड झाली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे छत तसेच एका बाजूस असलेल्या व्हरांड्याचा काही भाग कोसळला. ही दुर्घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. इमारतीत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे पथक प्रयत्न करत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number