Mukhyamantri Mahila Rojgar Yojana: बिहारमध्ये महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता थेट हस्तांतरित केला गेला. एकूण 7500 कोटी रुपयांचा निधी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करणे आहे.
लाभार्थी महिलांना शेती, पशुपालन, हस्तकला, शिवणकाम किंवा लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रारंभिक 10000 रुपयांचे अनुदान मिळेल, तसेच पुढील टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मदत मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये स्वयं-मदत गटांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे ग्रामीण हाट-बाजारातून त्यांच्या उत्पादनांची विक्रीस प्रोत्साहन मिळेल. बिहार सरकारच्या माहितीनुसार, ही योजना जिल्हा, ब्लॉक, क्लस्टर आणि गाव पातळीवर राबविली जाईल. या योजनेत एक कोटींपेक्षा अधिक महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
हेही वाचा – Donald Trump New Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा 100% टॅरिफ बॉम्ब ; औषध उत्पादनांवर थेट परिणाम
कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही?
ज्या महिलांचे किंवा त्यांच्या पतींचे उत्पन्न आयकराच्या 2अधीन आहे.
ज्या महिला किंवा त्यांच्या पती सरकारी नोकरीत आहेत.
ज्या महिला किंवा त्यांच्या पती कंत्राटी नोकरीत आहेत.
हेही वाचा – IAF MiG-21 Farewell : 60 वर्षांची सेवा पूर्ण; MiG-21 चं शेवटचं उड्डाण
बिहारमध्ये महिला सक्षमीकरणाची नवी दिशा
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ही योजना महिलांना आर्थिक बळकटी देण्यासोबत त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला स्वावलंबी होण्यास सक्षम होतील. या योजनेच्या माध्यमातून बिहारमध्ये महिला सक्षमीकरण आणि आर्थिक क्रांतीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.