Crime News : प्रेयसीच्या लेकीचा विनयभंग करणं नराधम प्रियकराला पडलं महागात; संतप्त आईने गुप्तांग कापलं अन्…

घटनेच्या दिवशी सुरेशने प्रचंड दारूचे सेवन केले होते. नशेत असताना त्याने सुनिताच्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.<br/>

Crime News : प्रेयसीच्या लेकीचा विनयभंग करणं नराधम प्रियकराला पडलं महागात; संतप्त आईने गुप्तांग कापलं अन्…

Crime News : आंध्र प्रदेशातील अनंतपूर शहरात एका आईने आपल्या मुलीच्या रक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रायव्हर्स कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुनिता नावाच्या महिलेसोबत ताडीपत्री येथील ऑटोचालक सुरेश हा गेल्या काही दिवसांपासून राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुरेशने प्रचंड दारूचे सेवन केले होते. नशेत असताना त्याने सुनिताच्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

आईने घेतला आक्रमक पवित्रा, गुप्तांग कापले
मुलीसोबत घडलेला हा सर्व प्रकार समजताच आई सुनिताचा राग अनावर झाला. स्वतःच्या लेकीचे संरक्षण करण्यासाठी तिने अजिबात वेळ न दवडता घरातील धारदार चाकूने सुरेशच्या गुप्तांगावर वार केले. या धक्कादायक कृत्यात तिने मुलीची मदत घेतल्याचेही समोर आले आहे. हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेला सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आरडाओरड ऐकून जमलेल्या स्थानिकांनी त्याला तातडीने अनंतपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Menstrual Cup Drug Smuggling : संतापजनक! पीरियड्स कपचा वापर करून ड्रग्जची तस्करी; महिला तस्कर जेरबंद

पोलीस ठाण्यात जाऊन केले आत्मसमर्पण
या हिंसक घटनेनंतर सुनिताने पळून न जाता थेट 'वन टाऊन' पोलीस ठाणे गाठले आणि अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पीडित मुलगी आणि तिच्या आईचे सविस्तर जबाब नोंदवले जात असून या हल्ल्यामागील इतर सर्व बाजूंचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सध्या या घटनेमुळे संपूर्ण अनंतपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number