Shikhar Dhawan Cheating Case: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांच्याशी संबंधित मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. धवन यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित काम पाहणाऱ्या लेगॅक्सी या कंपनीचे सीईओ अमितेश शाह यांच्यावर गुडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धवनचे नाव, फोटो आणि करारांचा गैरवापर करून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
धवनचे नाव वापरून खोटे करार
मिळालेल्या माहितीनुसार, शिखर धवनच्या कंपनीपासून वेगळे झाल्यानंतरही अमितेश शाह यांनी स्वतःला धवनचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सादर केले. त्यांनी धवनशी संबंधित असल्याचे दाखवण्यासाठी काही करारांमध्ये खोटेपणा करून बनावट कागदपत्रे तयार केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – World Boxing Cup: भारताचा वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये गौरव! मीनाक्षी हुडा आणि प्रीती पवारने जिंकले सुवर्णपदक
अनधिकृत फोटो वापर आणि बनावट जाहिरात करार
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, आशिया कपदरम्यान अनधिकृत जाहिरातींमध्ये धवनचे फोटो वापरणे, कालबाह्य झालेले करार संपले असूनही ते चालू असल्याचा खोटा दावा करणे, आणि क्रिएटर अथॉरिटी नसतानाही नवीन करार करणे, असे अनेक गंभीर आरोप अमितेश शाह यांच्यावर आहेत.
हेही वाचा – Sourav Ganguly: सौरव गांगुलीने गौतम गंभीरला सुनावलं म्हणाला; 'कोणताही निर्णय घेण्याआधी…'
40 लाख रुपये परवानगीशिवाय हस्तांतरित?
तक्रारीत अमितेश यांनी धवन किंवा त्यांच्या व्यवस्थापन पथकाला कोणतीही माहिती न देता सुमारे 40 लाख रुपये एका वेगळ्या कंपनीकडे हस्तांतरित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार, संदेशवहिनी आणि करारांचे दस्तऐवज पोलीस तपासत आहेत. यापूर्वीही शिखर धवनचे नाव एका ऑनलाइन बेटिंग कंपनीच्या प्रमोशन प्रकरणात समोर आले होते. त्या चौकशीदरम्यान धवन आणि माजी क्रिकेटर सुरेश रैना यांच्या मालकीच्या 11 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.