Salt Lake Stadium: कोलकातातील मेस्सीच्या भेटीदरम्यान प्रचंड गोंधळ; चाहत्यांच्या तोडफोडीमुळे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

24 तासांनंतर 'टीओआय'च्या पाहणीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकारणी आणि आयोजकांच्या गर्दीतून कोणीतरी मेस्सीच्या टी-शर्टवर ऑटोग्राफसाठी आग्रह करत होता.

Salt Lake Stadium: कोलकातातील मेस्सीच्या भेटीदरम्यान प्रचंड गोंधळ; चाहत्यांच्या तोडफोडीमुळे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Salt Lake Stadium: सॉल्ट लेक स्टेडियमवर शनिवारी झालेल्या कार्यक्रमात अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीच्या भेटीदरम्यान प्रचंड गोंधळ उडाला. 24 तासांनंतर 'टीओआय'च्या पाहणीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकारणी आणि आयोजकांच्या गर्दीतून कोणीतरी मेस्सीच्या टी-शर्टवर ऑटोग्राफसाठी आग्रह करत होता. पेनाने त्याच्या शरीराला ओरखडल्यामुळे सुरक्षा पथक सतर्क झाले आणि परिस्थिती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. 

यावेळी मेस्सीने आयोजक शताद्रू दत्ताला सांगितले की, त्याला स्टेडियम सोडावे लागेल. त्यानंतर 60 हजार हून अधिक प्रेक्षकांनी आपला राग मैदानावर व्यक्त करत खुर्च्या फोडल्या, लोखंडी कुंपण कोसळवले आणि मैदानात बाटल्या फेकल्या. व्हीआयपी गॅलरी आणि सोफ्यांनाही हानी झाली, प्रशासनाने अंदाज लावला की, या नुकसानीची रक्कम सध्या 2.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

हेही वाचा – T20 Cricket: टी-20चा नवीन चेस मास्टर! 'या' खेळाडूने मोडला विराट कोहलीचा विक्रम

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मेस्सी, सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांना घेणारी गाडी स्टेडियममध्ये दाखल होताच व्हीआयपी, राजकारणी आणि पोलीस यांच्यामुळे गर्दी अधिक वाढली. चाहत्यांनी फोटो, सेल्फी, ऑटोग्राफसाठी धक्कादायक पद्धतीने खेळाडूंना ढकलले. आयोजक वारंवार शांतता राखण्याचे आवाहन करत होते, परंतु गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

हेही वाचा – Amruta Fadnavis And Lionel Messi: मुख्यामंत्र्यांच्या पत्नीचा रूबाब, थेट मेस्सीसोबत काढला सेल्फी आणि…

दरम्यान, माजी भारतीय खेळाडू दिपेंदू बिस्वास आणि मेहताब हुसेनसह अनेक चाहत्यांना जर्सीवर सही मिळवण्याची संधी मिळाली, तरीही गोंधळ थांबला नाही. व्हीआयपी पास धारक आणि पोलीस यांच्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. तथापी, बिधाननगरचे आयुक्त मुकेश यांनी सांगितले की, कार्यक्रमातील अनेक सहभागी लोकांना समन्स बजावण्यात आले आहेत आणि नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे. प्रशासनाने घटनास्थळावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number