Kapil Cafe Shooting Case : दिल्ली गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबारामागील सूत्रधार अटकेत

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार बंधू मान सिंगला अटक केली आहे.

Kapil Cafe Shooting Case : दिल्ली गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबारामागील सूत्रधार अटकेत

Kapil Cafe Shooting Case : कॅनडामधील विनोदी कलाकार कपिल शर्मा यांच्या KEAPS कॅफेवर झालेल्या गोळीबाराच्या मालिकेप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार बंधू मान सिंगला अटक केली आहे. हा हल्ला कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडलेला असल्याचा संशय आधीपासूनच व्यक्त केला जात होता.

भारतात परतल्यानंतर अटक

गोळीबारानंतर मान सिंग भारतात परतला होता. तपासात तोच मुख्य शूटर असल्याचे उघड झाले. त्याचे गोल्डी ब्रार आणि गोल्डी ढिल्लन या दोघांशी थेट संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही अटक अत्यंत महत्त्वाची असून यामुळे संपूर्ण कट उलगडण्यास मदत होणार आहे. मान सिंगच्या नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी टोळीशी असलेल्या संबंधांचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा – Kiara Advani – Siddharth Malhotra : कियारा- सिद्धार्थनं जाहीर केलं लेकीचं नाव; नावाचा अर्थही आहे खास

कपिल शर्मा कॅफेवरील हल्ल्यांची मालिका

कपिल शर्माचा KEAPS कॅफे जुलै 2024 मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे सुरू झाला. परंतु कॅफे सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच त्यावर गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. पहिला हल्ला 10 जुलै, दुसरा हल्ला 7 ऑगस्ट, तिसरा हल्ला 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. सुदैवाने, तिन्ही हल्ल्यांत कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा – SC Guidelines Comedians: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने लावलं कामाला, दिव्यांग व्यक्तींसाठी करावं लागणार 'हे' खास काम

घटनांवर प्रतिक्रिया देताना कपिल शर्मा यांनी आश्चर्यकारकपणे सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, “गोळीबाराच्या प्रत्येक घटनेनंतर कॅफेला येणाऱ्यांची संख्या आणखीन वाढली.” कपिलची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत राहिली. या अटकेनंतर गुन्हे शाखेचा तपास आणखी वेगाने होणार असून लवकरच या प्रकरणातील इतर आरोपींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number